डोंबिवली : बाहेरच्या देशातून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू | पुढारी

डोंबिवली : बाहेरच्या देशातून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा

डोंबिवलीत दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या प्रवाशाला करोना झाल्यानंतरकल्याण डोंबिवली महापालकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून आरोग्य विभागाने बाहेच्या देशातून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू केला आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या कोरोना बाधित झालेल्या प्रवाशाचा विमानातून प्रवास करणारा आणखीन एक सहप्रवासी डोंबिवलीतील असून त्याची चाचणी करण्यात आली आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. सध्या जवळपास नायजेरिया मधून आणखी सहा प्रवासी डोंबिवलीत आले असून त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेले रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेचा आरोग्य विभाग अधिक सतर्क झाला असून त्या रुग्णांसोबत ज्या ४२ जणांनी प्रवास केला आहे त्या प्रवाशांची यादी सरकारकडे पाठवण्यात आली असून कोणाला कोरोनाची बाधा झाली आहे का याचा शोध घेतला जाणार आहे.

दरम्यान या प्रवाशासोबत आणखी एक ज्येष्ठ नागरिक डोंबिवलीचा आहे. कोरोनाग्रस्त प्रवाशाचा एक सहप्रवासी डोंबिवलीमधील असून या ५० वर्षीय गृहस्थाची आज कोरोना चाचणी केली जाणार आहे. तर दुसरीकडे रुग्ण सापडलेल्या इमारतीमधील सर्व नागरिकांचे थुंकीचे नमुने देखील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. नायजेरियातून आलेल्या आणखी सहा जणांचा चाचणीचा अहवाल येणे बाकी असून नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसून केवळ प्रतीबंधात्मक काळजी घेण्याचा प्रयत्न असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले

दरम्यान, दक्षिण अफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांच्या जिनोम सिक्वेन्सिंगच्या अहवालाबाबत आरोग्य विभागाला अद्याप कोणतीही माहिती प्राप्त झाली नसल्याचं पालिकेच्या साथरोग प्रतिबंधक अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले आहे.

Back to top button