Thane Municipal Corporation Recruitment: ठाणे महापालिकेतील 1773 पदांची भरती पुन्हा मार्गी; पुढील महिन्यापासून प्रक्रिया सुरू

सहा महिन्यांच्या विलंबानंतर उमेदवारांना दिलासा; जिल्हानिहाय परीक्षा केंद्रांची तयारी सुरू
Thane Municipal Corporation Recruitment
Thane Municipal Corporation RecruitmentPudhari
Published on
Updated on

ठाणे : तांत्रिक कारणांमुळे तब्बल सहा महिन्यांपासून रखडलेल्या ठाणे महापालिकेतील 1773 पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.या भरती प्रक्रियेला पुढच्या महिन्यांपासून पुन्हा सुरुवात होणार असून पुढच्या परीक्षेसाठी जिल्हानिहाय केंद्रांचा शोध सुरु करण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे.

Thane Municipal Corporation Recruitment
Water Rate Hike KDMC: पाणी दरवाढीला ब्रेक! सर्वपक्षीय नगरसेवकांचा महासभेत ठाम विरोध

ठाणे महापालिकेतील क आणि ड संवर्गातील 1773 पदांसाठी ऑगस्ट 2025 रोजी जाहिरात काढण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक पदे ही आरोग्य विभाग आणि अग्निशमन विभागासाठी असून यामध्ये इतर पदांचा देखील समावेश आहे. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागल्याने या भरती प्रक्रियेला ब्रेक लागला होता. याशिवाय या भरती प्रक्रियेच्या विरोधात काही जणांनी न्यायालयात देखील धाव घेतल्याची चर्चा सुरु होती. अखेर सहा महिन्यांच्या नंतर या भरती प्रक्रियेला पुन्हा एकदा सुरुवात होणार असून पुढच्या महिन्यांपासून ही प्रक्रिया पुन्हा सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.

Thane Municipal Corporation Recruitment
Pune Gas Shortage: पुण्यातील जुन्या हॉटेल्सवर गॅस तुटवडा; ग्राहकांसाठी चिंता वाढली

या भरती प्रक्रियेसाठी जिल्हा निहाय केंद्र असणार आहेत. त्या त्या जिल्ह्यातील अर्जदारांची परीक्षा ही त्याच जिल्ह्यात होणार असून यासाठी केंद्राचा शोध घेण्याच्या कामाला देखील सुरुवात करण्यात आली आहे. ज्या ज्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र असणार आहे त्या ठिकाणी ठाणे महापालिकेचे एक निरीक्षक असणार आहे अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे गेले सहा महिने भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अर्जदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Thane Municipal Corporation Recruitment
Pandit Bhimsen Joshi Hospital Negligence: भाईंदर हादरले! आयसीयूमध्ये उंदराने रुग्णाचा हात कुरतडला; निष्काळजीपणाचा संतापजनक प्रकार

1773 पदांसाठी 75 हजार अर्ज

ठाणे महापालिकेच्या 1773 पदांसाठी काढण्यात आलेल्या भरती प्रक्रियेसाठी तब्बल 75 हजार इच्छुकांनी विविध पदासाठी अर्ज केले आहेत. यासाठी प्रत्येक अर्जदारांकडून 1800 रुपयांचे शुल्क देखील घेण्यात आले आहे. भरती प्रक्रियेला पुन्हा सुरुवात होणार असल्याने अर्जदारांच्या आशा देखील पल्लवित झाल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news