Dombivli Gudi Padwa Rally: डोंबिवलीत हिंदू नववर्ष स्वागतासाठी भव्य बाईक रॅली; तरुणाईचा उत्स्फूर्त जल्लोष

भगव्या फेट्यांतील युवक-युवतींचा जयघोष; गुढीपाडवा स्वागत यात्रेसाठी नागरिकांना आवाहन
Dombivli Gudi Padwa Rally
Dombivli Gudi Padwa RallyPudhari
Published on
Updated on

स्वागतयात्रेत सहभागी होण्याचे आवाहन

संयोजन समिती सदस्य विलास आंबेकर, महेश पवार, अमित सराफ आणि आकाश गायकवाड यांनी नववर्ष स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या पुढील कार्यक्रमांचे स्वरूप सांगून उपस्थितांचे आभार मानून रॅलीची सांगता केली. दरम्यान, बाईक रॅलीमुळे संपूर्ण डोंबिवलीत आनंददायी आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. येत्या गुरूवारी 19 मार्च रोजी होणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत डोंबिवलीकर मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

Dombivli Gudi Padwa Rally
PCMC Water Tank Cleaning Contract: महापालिकेच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता; 2.24 कोटींच्या कामास मंजुरी

डोंबिवली : येत्या गुरूवारी 19 मार्च रोजी गुढीपाडव्याला डोंबिवलीत हिंदू नववर्ष स्वागत सोहळा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात येणार आहे. स्वागत यात्रेच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी डोंबिवलीत भव्य बाईक रॅली काढण्यात आली होती. भगवे झेंडे, घोषणांचा जयघोष आणि तरूणाईच्या उत्साहामुळे डोंबिवली नगरीत चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. या रॅलीत मोठ्या उत्साहात सहभागी झालेल्या बाईकस्वारांनी नागरिकांमध्ये हिंदू नववर्षाच्या स्वागताचा उत्साह निर्माण केला.

Dombivli Gudi Padwa Rally
Water Rate Hike KDMC: पाणी दरवाढीला ब्रेक! सर्वपक्षीय नगरसेवकांचा महासभेत ठाम विरोध

बाईक रॅलीचा प्रारंभ नेहरू रोडला असलेल्या अप्पा दातार चौकातील श्री गणेश मंदिर येथून करण्यात आला. त्यानंतर रॅलीने जोशी हायस्कूल जवळचा पूल ओलांडून गणेश नगर पोलिस चौकी, गणेश नगर पेट्रोल पंप, अग्निशमन दल कार्यालय, श्रीधर म्हात्रे चौक, दोन टाकी, उमेशनगर, रेती बंदर चौक, नवीन विष्णूनगर पोलिस ठाणे, आनंद नगर उद्यान, सम्राट चौक, पंडित दीनदयाळ मार्ग, राणा प्रताप स्वामी विवेकानंद शाळा, जोंधळे शाळा, साऊथ इंडियन शाळा, स्टेशन रोड, कोपर पूल ओलांडून टंडन रोड, डी. एन. सी. शाळा, प्रगती कॉलेज, कलावती आई मंदिर, नांदिवली मार्ग, पी अँड टी कॉलनी हनुमान मंदिर, गांधीनगर, तर्टे प्लाझा चौक, गिरनार चौक, मानपाडा रोड, अभिनव शाळा, मिलापनगर, ओमकार शाळा, आर. आर. हॉस्पिटल, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि शहीद विनयकुमार सच्चान स्मारक (क्रीडा संकुल) येथे समारोप करण्यात आला.

Dombivli Gudi Padwa Rally
India LPG Shortage: भारतात LPG तुटवड्याचा पहिला बळी.... पंजाबमधील सेहना गावात घडली दुर्दैवी घटना

या रॅलीत जवळपास 120 बाईकस्वारांसह डोंबिवलीकरांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे डोक्यावर भगवे फेटे परिधान करून तरूण-तरूणी तसेच महिलांचा देखिल उत्स्फूर्त सहभाग पहायला मिळाला.

बाईकस्वारांनी भारत माता की जय...वंदे मातरम...गणपती बाप्पा मोरया...आणि प्रभू रामचंद्र की जय...अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून सोडला होता. श्री गणेश मंदिराचे विश्वस्त, तसेच संयोजन समितीच्या सदस्यांनी श्रीफळ वाढवून आणि झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ केला.

बाईकस्वारांनी रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या नागरिकांना गुरूवारी 19 मार्च रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news