School Boy Murder: अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा; एकाची भोसकून हत्या | पुढारी

School Boy Murder: अल्पवयीन विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा; एकाची भोसकून हत्या

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : School Boy Murde : ठाण्याच्या ज्ञानेश्वर नगर परिसरातील राजश्री शाहू महाराज विद्यालयात मंगळवारी सकाळी दहावीच्या मुलांचे वर्ग भरल्यावर किरकोळ कारणावरून उदभवलेल्या वादात एका 15 वर्षीय विद्यार्थ्यास आपला जीव गमवावा लागला आहे. दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत धारदार हत्याराने छातीत भोसकण्यात आल्याने तुषार साबळे या शालेय विद्यार्थीचा मृत्यू झाला.

डोक्यात टपली मारण्यावरून हा क्षुल्लक वाद निर्माण झाला होता. त्यानंतर हा वाद वाढत गेला आणि विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. हा वाद सोडवण्यासाठी याच शाळेत नुकताच 10 वी ए डिव्हीजनमध्ये प्रवेश घेतलेला तुषार साबळे गेला. यावेळी याच्या छातीत धारधार वस्तु मारल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे वागळे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय शंकर ढोले यानी सांगितले. या प्रकरणी वागळे स्टेट पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून फरार झालेल्या अल्पवयीन आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Back to top button