BBM 3 : स्नेहा सोनालीला म्हणते, 'लोटांगण घाल झाडू मार' | पुढारी

BBM 3 : स्नेहा सोनालीला म्हणते, 'लोटांगण घाल झाडू मार'

मुंबई; पुढारी ऑनलाईन : बिग बॉस मराठीच्या ( BBM 3 ) घरात आज सुरू होणार्‍या ‘संयमची ऐशी तैशी’ या कार्यामध्ये एका टीममधील म्हणजेच नरकातील सदस्य स्वर्गातील सदस्यांना कठीण असे टास्क दिले जात आहेत. स्नेहा सोनालीला ‘लोटांगण घाल झाडू मारण्याचा टास्क दिला आहे.

BBM 3 मध्ये ‘संयमची ऐशी तैशी’ या टास्कमध्ये स्नेहा सोनालीला लोटांगण घालत झाडू मारायला सांगणार आहे. यातील खास म्हणजे, स्नेहा सोनालीला सागते की, ‘लोटांगण घालत झाडू मार. कोठेही थांबायचं नाही.’ हा टास्क अवघड असून हे पाहण्याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.

याच दरम्यान बिग बॉस घरातील सदस्य एकमेकांना खडेबोल बोलताना दिसत आहेत. सोनाली हा टास्क पुर्ण करत असताना विशाल दादूसशी काहीतरी बोलायला आला होता. यानंतर स्नेहाने त्याना ‘ओ तुम्ही मध्ये बोलायचे नाही…’ असे खडेबोल सुनावले. दररोजच घरातीस सदस्यांनी वेगवेगळ्या टास्कला सामोरे जावे लागत आहे. यामुळे हा शो चाहत्यांच्या घराघरात पोहोचला आहे.

bbm 3 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार ‘संयमाची ऐशी तैशी ‘

बघूया अजून काय- काय टास्क दिले सदस्यांना… तेव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

हेही वाचलंत का? 

पाहा व्हिडिओ : बहुरंगी कलाकार EP 1 : अभिनयाबरोबरच प्रार्थना बेहरेची अनोखी कलाकारी

Back to top button