ठाणे महापालिका निवडणूक : एक सदस्यीय प्रभाग रचनेवर काँग्रेस ठाम | पुढारी

ठाणे महापालिका निवडणूक : एक सदस्यीय प्रभाग रचनेवर काँग्रेस ठाम

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : २०१७ मध्‍ये ठाणे महापालिका निवडणुकीत  बहुसदस्यीय प्रभाग रचनेमुळे काँग्रेसच्या तिकिटांवर हमखास निवडून येणारे उमेदवार पराजित झाले. काँग्रेस पक्षाचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे या प्रभाग रचनेला पक्षाच्या पदाधिकाऱ्यांपासून कार्यकर्त्यांचा विरोध असून एक सदस्य प्रभाग रचनेवर ठाणे शहरातील काँग्रेस ठाम आहे.

त्यामुळे आगामी २०२२च्या ठाणे महापालिका निवडणूक एक सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेण्यासाठी महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या मंत्र्यांना सूचित करावे. अशी मागणी बुधवारी दिलेल्या निवेदनाद्वारे ठाणे शहर काँग्रेसने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली. महापालिका निवडणूक एक सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घेणे. महाविकास आघाडीतील कॉंग्रेसच्या मंत्र्यांना सुचित करावे. अशी विनंती त्या निवेदनात केली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या २५ ऑगस्ट २०२१ च्या परिपत्रकानुसार – शासनाने ३१ डिसेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र महापालिका (सुधारणा) अधिनियम २०१९ अन्वये अधिसूचना काढली आहे.

सर्व महापालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी एक सदस्यीय असेल, अशी अधिसूचना काढली आहे.

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील मंत्री चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार (पॅनल) निवडणूक घेतील.

याकरीता जोरदार प्रयत्न केल्याचा आरोप काँग्रेस ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेल्या निवेदनात केला आहे.

तसेच हेच मंत्री राज्य निवडणूक आयोगावर दबाव टाकत असल्याचे नमूद केले आहे.

२०१७ प्रमाणे २०२२ मध्ये पक्षाचे नुकसान होऊ नये म्हणून आगामी २०२२ च्या पालिका निवडणुका एक सदस्यीय प्रभाग रचनेनुसार घ्याव्यात. महाविकास आघाडीतील कॉंग्रेसच्या मंत्र्यांना तसे सुचित करावे, अशी विनंती त्या निवेदनात शेवटी केली आहे.

हेही वाचलं का ? 

Back to top button