कर्मवीर भाऊराव पाटील जंयतीविशेष : स्थापना २२ डिसेंबर२००५, स्थान – कोल्हापूर मसुटे मळा. पंचसुत्री – सतसंगती, व्यसनमुक्ती, सुसंस्कार, शाकाहार, समाजोन्नती, सेवेचा मागोवा…
अकरा भव्य जीवांनी आत्मकल्याणास्तव दिगंबर दीक्षा घेतली. ३० भव्य जीव प्रतिमा धारण करून आत्मकल्याणाच्या हमरस्त्यावर जाणेसाठी प्रयत्नशील. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मातृभूमितूनच 'मरावे परि वृक्षरुपी उरावे' हा अभिनव उपक्रम सुरू करून हजारो रोपांचे वृक्षारोपण व संवर्धन, रक्षाविसर्जनावेळी रक्षा नदी, ओढापात्रात न टाकता शेतात खड्डा काढून मृत व्यक्तीची आठवण सदैव रहावी असा उपक्रम सुरू केला. पर्यावरणाचे रक्षण व्हावे यासाठी 'झाडे लावा – मुबलक ऑक्सिजन मिळवा' हा उपक्रम गावोगावी सुरू केला.
सम्मेदशिखरजी, गिरनार, कुंथलगिरी व गावोगावी स्वच्छता अभियान, रक्तदान उपक्रमातून सर्वांपर्यंत पोहोचण्याचा अविरत प्रयत्न केला. सिद्धक्षेत्र कुंथलगिरी येथे धर्म संस्कार शिबिरातून हजारों भव्य जीव व्यसनमुक्त झाले. अंध, अपंग, मूकबधिर, गरीब, विधवा व स्वाध्यायी ७५०० भव्य जीवांना सम्मेद शिखरजी मोफत वंदना घडविली,
स्वाध्यायमालेतून लाखों जीवांच्या सहभागाने सुसंस्कार करण्यास कटिबध्द, महापुरावेळी असंख्य गावांत जनावरांना चारा, खाद्यवाटप, गरीब पूरग्रस्त, सैनिकांना मोफत जेवण, गरीब कुंटुंबियांना कपड़े, धान्य, भोजन महत्त्वपूर्ण वाटप, प्रथमाचार्य शांतिसागर महाराज व महापुरषांची जयंती, पुण्यतिथी सुरु केली.
राष्ट्रीय एकात्मता, जनजागरण रॅलीचे जबरदस्त आयोजन, वृद्धापकाळ सुखी होणेसाठी वृध्दांचे पाद्यपूजन, कोरोनाकाळात प्रबोधन, मास्क, औषध वाटप, कोरोना योद्ध्यांचा सन्मान, युवक- युवतींसाठी करिअर मार्गदर्शन असे उपक्रम केले.
पाणी आडवा – पाणी जिरवा या उपक्रमातून अनेक बंधारे बांधले, श्रवणबेळगोळ येथे महामस्तकाभिषेक (2018 ) वेळी 530 संघटक- संघटिका यांच्या समर्पित निरपेक्ष, निरालंब, निःसंदेह, निर्भर, निःस्वार्थ सेवेतून 55 टन कचरा गोळा केला व समाजसेवेचा आंतरराष्ट्रीय इतिहास रचला.
बालकांपासून वृद्धांपर्यंत सुसंस्कार करणारी ही चळवळ आहे. राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त राहून निरपेक्ष, निःस्वार्थ सेवा करणारे खुले शांतिपीठ, अंध, अपंग, गरीब, मतिमंद, विधवा, स्वाध्यायी भव्य जीवांची मोफत तीर्थवंदना करणारे दालन, सत्संगती, व्यसनमुक्ती, सुसंस्कार, शाकाहार व समाजोन्नती ही पंचसुत्री घेऊन सेवेस सज्ज असलेली संघटक- संघटिकांची जिगरबाज फौज,
प्रथमाचार्य शांतिसागर महाराज व वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांची विचारधारा जपणारे खुले मंच, प्रत्येक व्यक्तीजवळील सुप्त गुणांचा विकास व्हावा व त्यांच्यावर सद्विचारांचे पैलू पाडणारी खाण, या, शिका, शिकवा सहभागी व्हा अन् सन्मतीच्या विशाल परिवारात निरपेक्ष सेवेचा भरघोस आनंद लुटा. स्वाध्याय मालेतून लाखों जीवांच्या सहभागाने सुसंस्कार करणेस कटिबध्द.
समाजामध्ये महिला वर्ग नेहमी घरच्या कामात व्यस्त असतात. चूल आणि मूल यामध्ये गुरफटलेल्या महिलेला इतर कोणत्याही गोष्टीमध्ये वाव मिळत नाही. अशा महिलांना सन्मती संस्कार मंचच्या माध्यमातून संघटीत करणे, त्यांना सुसंस्काराचा विचार, धर्म जागृतीच्या मेळाव्यातून देण्याची संकल्पना आली. याच संकल्पनेतून " सन्मती होममिनिस्टरचा' ' कार्यक्रम गावोगावी घेण्यासाठी एक समिती तयार झाली.
त्या समितीच्या माध्यमातून महिलांना स्वाध्यायाची व धर्माची गोडी लावणे, अशा विविध धार्मिक प्रश्नमंजुषा घेणे, विविध खेळ खेळणे, त्याचबरोबर प्रथमाचार्य शांतीसागर महाराज यांची जीवनचरित्र समाजासमोर आणण्यासाठी सन्मतीने भारुड, पोवाडा, विविध धार्मिक गीते घेऊन चार तासांचा हा भरगच्च कार्यक्रम घेऊन जाण्याचे निश्चित केले.या कार्यक्रमाला समाजातून प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.
मराठवाड्यात अंबड येथे ७५ वा कार्यक्रम झाला. या उपक्रमाचे लवकरच शतक गाठण्याचा संघटक व संघटिकांनी सिध्द क्षेत्र कुंथलगिरी येथे झालेल्या बैठकीत संकल्प केला.
– सुनील पाटील (ऐतवडे बुद्रूक)
हेही वाचलंत का?