कुडाळ (सातारा); पुढारी वृत्तसेवा : महाबळेश्वर तालुक्यामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाली असल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी महाबळेश्वर येथील सागर उर्फ बाबा हनुमंत गायकवाड (वय ३०), आशुतोष मोहन बिरामणे (२२) या संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
दोन्ही आरोपी मुनावरळ हाउसिंग सोसायटी येथे राहणारे आहेत. यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पीडित मुलीला धमकावले. वारंवार तिच्याशी इच्छेविरुद्ध शरीर संबंध ठेवले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलगी ही गरोदर राहिली. तिची प्रसूती झाली आहे.
या सर्व घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तीन दिवसांपूर्वीच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. शीतल खराडे जानवे यांना माहिती मिळाली होती. अज्ञात खबऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती मिळाली होती.
त्यानंतर तत्काळ उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर शीतल खराडे जानवे यांनी घटनास्थळी थेट भेट देली. पीडिताला विश्वासात घेत न्याय मिळवून देण्याचा विश्वास दिला. त्यानंतर पीडित मुलीने व तिच्या कुटुंबियांनी या संदर्भात सर्व हकीकत महाबळेश्वर पोलिस स्थानकामध्ये सांगितली.
दरम्यान, संबंधित संशयितांनी पीडित कुटुंबियांनी तक्रार देऊ नये यासाठी धमकी दिल्याचे सांगितले.
त्यामुळे पीडित कुटुंब तक्रार देण्यास पुढे येत नव्हते. मात्र, शीतल जानवे यांच्याकडे अज्ञात खबऱ्याने ज्यावेळी पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराची हकीकत सांगितली. त्यावेळी तत्काळ शीतल जानवे यांनी यासंदर्भात तपास सुरू केला.
पीडित कुटुंबीयांना विश्वासात घेतले. याप्रकरणी शहरातील संशयित दोन आरोपींना महाबळेश्वर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सागर उर्फ बाबा हनुमंत गायकवाड व आशुतोष मोहन बिरामणे याच्यासोबत आणखी काही आरोपी सापडण्याची शक्यता आहे.
पाहा व्हिडिओ-