रुपाली चाकणकरांकडून एफआयआर दाखल; प्रवीण दरेकरांना रंगलेल्या गालाचा ‘मुका’ वक्तव्य महागात

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

पुणे; पुढारी ऑनलाईन : रुपाली चाकणकरांकडून एफआयआर दाखल : विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष असल्याची टीका भोवली आहे.

रुपाली चाकणकरांकडून एफआयआर दाखल

एफआयआर दाखल केल्यानंतर रुपाली चाकणकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की,  प्रविण दरेकर तुम्ही जनाची नाही तर मनाची लाज राखून महिला भगिनींची माफी मागायला हवी. कायद्याच्या चौकटीत राहून आम्हा महिलांना न्याय मिळेलष या उद्देशाने याबाबत मी पुण्यात FIR दखल केले आहे.

सिंहगड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल

त्यांच्या या वक्तव्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अत्यंत आक्रमक भुमिका घेत, प्रवीण दरेकरांविरोधात पुण्यात सिंहगड पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. त्यांनी माफी मागावी अशी भूमिका रुपाली चाकणकरांनी घेतली आहे.

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादी प्रवेश निश्चित केल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी पुण्यात बोलताना असभ्य भाषेत टीका केली होती. त्यांनी राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष असल्याची टीका केली होती. या टीकेवर राष्ट्रवादीने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे.

रुपाली चाकणकर यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले होते की, आपल्या वक्तव्यातून असे दिसते की, आपला आणि अभ्यासाचा दुरान्वये संबंध दिसत नाही. आपण जे वाक्य उच्चारला ते मला बोलण्यासही लाज वाटते. आपल्या बोलण्यातून वैचारिक दारिद्र्य दिसून येते. तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली.

त्यांनी पुढे म्हटले आहे की आपल्या पक्षातील काही महिला अशा आहेत ज्या महिलांच्या कैवारी असल्याचे आव आणतात. आज त्यांची मला त्यांची कीव वाटते, त्या अशा पक्षात काम करतात जिथं हा विचार आहे. त्यामुळे पक्षाची संस्कृती दिसून येते. केलेल्या वक्तव्याबद्दल तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस महिलांचा अपमान करणाऱ्यांचे गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकते.

काय म्हणाले होते प्रवीण दरेकर?

पुण्यामध्ये बोलताना प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादीवर शेलक्या शब्दात टीका केली होती. सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा अप्रत्यक्ष संदर्भ देत त्यांनी राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालाचा मुका घेणारा पक्ष असल्याची टीका केली होती.

या पक्षाला गरीबांकडे पाहण्यासाठी वेळ नाही. सुभेदार, कारखानदार, बँका आणि उद्योगपतींचा हा पक्ष असल्याची टीका त्यांनी केली होती.

हे ही वाचलं का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news