केज; पुढारी वृत्तसेवा: केज येथे मध्यरात्री झालेल्या अपघातात (Accident) दोन तरुण जागीच ठार. एक प्रशिक्षणार्थी पोलीस जवान जखमी झाला आहे. सुजित सुरेश राऊत (वय २०), सुमित संदीपान सिरसट (वय १८, दोघे रा .फुलेनगर केज) अशी या अपघातात (Accident) ठार झालेल्यांची नावे आहेत. तर विजयकुमार पांडुरग घोळवे (वय ३५, रा. समतानगर केज) हे जखमी झाले आहेत.
या बाबतची माहिती अशी की, २१ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १:०० वाजण्याच्या सुजित राऊत, सुमित सिरसट आणि गडचिरोली येथे पोलीस प्रशिक्षण घेत असलेले विजयकुमार घोळवे मोटार सायकलहून (क्र. (एमएच-४४/एम-२३०३) हे घरी जात होते. या दरम्यान केज-बीड महामार्गावर कानडी रोडवरील कांचन मेडिकलसमोर एका अज्ञात वाहनाने माेटारसायकलला मागून धडक दिली.
डोक्याचा मार लागल्याने सुजित आणि सुमित जागीच ठार झाले.
अपघातानंतर मोटारसायकल सुमारे १०० ते १५० फूट फरफटत गेली . विजयकुमार घोळवे जखमी झाले.
अपघातातातील अज्ञात वाहन कळंब चौकातून कळंबच्या दिशेने पुढे गेले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, रमेश सानप, बाळासाहेब अहंकारे व चालक हनुमंत गायकवाड हे घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी मृतदेह व जखमी व्यक्तीस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.
अपघातात मृत्यू पावलेला सुमित संदिपान सिरसट हा यंदा बारावी परीक्षा उत्तीर्ण झाला होता.
२१ रोजी त्याने अंबाजोगाई येथे MH-CET परिक्षा दिली आहे.
सुजित सुरेश राऊत याचे एक वर्षापूर्वी लग्न झाले हाेते. तो केश कर्तनालयात काम करीत आहे.
जखमी विजयकुमार घोळवे हे संरक्षण सेवेतून सेवा निवृत्त झाले हाेते. त्यानंतर ते गडचिरोली येथील पोलीस सेवेत भरती झाले हाेते. सध्या ते वैद्यकीय रजेवर असून केज येथे गावाकडे आले होते.
हेही वाचलंत का?