ठाणे : वेळेवर जागे झालो नाही, तर तिरंग्यावर चाँद दिसेल; मंत्री कपिल पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य | पुढारी

ठाणे : वेळेवर जागे झालो नाही, तर तिरंग्यावर चाँद दिसेल; मंत्री कपिल पाटील यांचे वादग्रस्त वक्तव्य

भिवंडी;  पुढारी वृत्तसेवा :  आम्ही सर्व हिंदुस्थानात राहत आहोत. आम्ही वेळेवर जागे झालो तर चांगलेच आहे; अन्यथा एक दिवस तिरंग्यावर चाँद दिसेल, असे वादग्रस्त विधान केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी येथे केले. त्याचवेळी वेळेवर जागे झालो, तर चंद्रावर तिरंगा दिसेल, असेही पाटील म्हणाले.

भिवंडीतील अंजूरदिवे येथे भरलेल्या दिव्य बालाजी दरबारमध्ये ते बोलत होते. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

पीठाधीश्वर बागेश्वर धाम सरकार यांचा दिव्य बालाजी दरबार प्रथमच भिवंडीत अंजूरदिवे येथे आयोजित केला होता. कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योगपती रुद्र प्रताप त्रिपाठी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिव्य बालाजी सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे प्रवचन झाले. त्यांच्या दर्शनासाठी मुंबई-ठाणे परिसरातील हजारो भक्त या ठिकाणी आले होते.

Back to top button