महावितरणच्या नावाने ग्राहकांची फसवणूक | पुढारी

महावितरणच्या नावाने ग्राहकांची फसवणूक

मीरा रोड : पुढारी वृत्तसेवा :  मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अनेक नागरिकांना महावितरण विजबिल विभागाच्या नावाने व इतर कंपनीच्या नावाने संदेश पाठवले जातात त्यामध्ये ग्राहकाने चालू महिन्याचे वीज बिल भरलेले असताना सुद्धा, तुमचे लाईट बिल किंवा मोबाईल बिल त्वरित भरा अन्यथा तुमचे विज कनेक्शन, मोबाईल कनेक्शन बंद करण्यात येईल असे संदेश पाठवून या क्रमांकावर संपर्क करा, असे सांगून फसवणूक केली जात आहे. ही नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी काळजी घेण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाईन पेमेंटसाठी अनेक अ‍ॅप उपलब्ध असून नागरीक त्यांचा सर्रासपणे वापर करत आहेत.

सर्व सोशल प्लेटफॉर्मवर बिल पेमेंट्स हे ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सुविधा ग्राहकांना वितरीत केली जाते. या पेमेंटसाठी वेगवेगळ्या कंपन्यांचे अ‍ॅप्स असून ते सुरक्षित मानले जाते. परंतु या गोष्टीचा फायदा घेऊ न काही अपप्रवृत्तीचे लोक ऑनलाईन पध्दतीने नागरीकांची फसवणूक करीत असल्याबाबत तक्रारी महावितरण कार्यालयाकडे प्राप्त होत आहेत. आपल्या महावितरणच्या विज बिलावर जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे. त्या मोबाईल नंबर वर संदेश किंवा व्हाट्स अँप वर संदेश येत आहेत. ग्राहकाने चालू महिन्याचे विज बिल भरलेले असताना सुध्दा, तुमचे लाईट बिल त्वरीत भरा अन्यथा तुमचे विज कनेक्शन बंद करण्यात येतील असे फसवणुकीचे संदेश येतात. अशा प्रकारचे संदेश आल्यास कोणीही रिप्लाय किंवा संपर्क करू नये. असे काही संदेश प्राप्त झाल्यास तात्काळ जवळच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच ग्राहकांनी ओटीपी (जढझ) शेअर करू नये किंवा कोणतेही अ‍ॅप डाऊ नलोड करू नये.

Back to top button