ठाणे : मुंब्र्यात मलनिस्सारण टाकी साफ करताना दोघांचा मृत्यू | पुढारी

ठाणे : मुंब्र्यात मलनिस्सारण टाकी साफ करताना दोघांचा मृत्यू

ठाणे ; पुढारी वृत्तसेवा नौपाडा परिसरात पाण्याच्या टाकीची साफसफाई करताना दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना, मुंब्र्यात मलनिस्सारण टाकी साफ करताना दोघांचा मृत्यू झाल्याची घटना (मंगळवार) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

मुंब्र्यातील कौसा स्टेडियमच्या बाजूला, तलावपाली रोड येथील ग्रेस स्क्वेअर सोसायटीच्या आवारातील मलनिस्सारण टाकी साफ करण्याचे काम सुरू होते. हनुमान व्‍यंकटी कोरपक्ववाड (वय २५) आणि सुरज राजू मढवी (२२) हे दोघे टाकीत उतरले होते.

याच दरम्यान ते दोघे त्या टाकीत बेशुद्ध झाले. ही माहिती मिळताच त्यांना त्याच इमारतीतील काही रहिवाश्यांनी टाकीमधून बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढून जवळील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले असता तेथील डॉक्टरानी त्यांना मृत घोषित केले. हा प्रकार सांयकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडल्‍याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.

Back to top button