नाशिक : लाकडी पोळपाटणे डोक्यात मारून पत्नीचा खून | पुढारी

नाशिक : लाकडी पोळपाटणे डोक्यात मारून पत्नीचा खून

पेठ (नाशिक), पुढारी वृत्तसेवा : पेठ तालुक्यातील पिठुंदी येथील पती पत्नीमध्ये झालेल्या भांडणाचे पर्यावसन खूनात झाले. पतीने लाकडी पोळपाटणे पत्नीच्या डोक्यावर, तोंडावर, हातावर मारल्याने ती गंभीर जखमी झाली. या जबर मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, सविता सिताराम पवार (वय ४५) व सीताराम सखाराम पवार (वय ४६) या पती -पत्नीत रात्री जोरदार भांडण झाले. दारुच्या नशेत असलेल्या सिताराम याने पत्नी सविताला लाकडी पोळपाटण्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत तिचा जागीच मृत्यू झाला. मयत सविता हिचा भाऊ रमेश शंकर फोद्दार (रा. बारपुडा, ता. कपराडा जि. बलसाड) यांने पेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. सीताराम पवार याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

या बाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक दिवानसिंग वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के. एस. कपिले, पोलीस हवालदार व्ही. एस. डंबाळे, दिलीप रहेर करीत आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक कविता फडतरे यांनी भेट देऊन तपासाबाबत सुचना दिल्या.

हेही वाचलंत का ? 

Back to top button