स्वयंम शिक्षण प्रयोगतर्फे महिला परिवर्तनकर्त्यांना ‘प्रेमा गोपालन सखी प्रेरणा पुरस्कार’ | पुढारी

स्वयंम शिक्षण प्रयोगतर्फे महिला परिवर्तनकर्त्यांना 'प्रेमा गोपालन सखी प्रेरणा पुरस्कार'

सोलापूर : स्वयंम शिक्षण प्रयोग (SSP) ही एक पुणे येथील स्वयंसेवी संस्था आहे जी, महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी आणि स्व: शिक्षणातून महिला सक्षमीकरण, तळागाळातील महिलांना मुख्य प्रवाहात सामाविष्ट करून सर्वसमावेशक, शाश्वत विकास साधते. आज महाराष्ट्र, केरळ आणि बिहार राज्यातील ज्या महिलांनी तळागाळात विकासाची कामे केली आहेत अशा महिला कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. १ फेब्रुवारी २०२४, सखी प्रेरणा दिवस साजरा केला जातो. ग्रामीण महिला उद्योजकांचा सन्मान करण्यासाठी आणि ग्रामीण महिलांसाठी लढणाऱ्या, स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या संस्थापिका, आणि सामाजिक उद्योजक स्व. प्रेमा गोपालन यांच्या जयंती स्मरणार्थ समर्पित आहे.

सेंद्रिय शेती, सूक्ष्म-उद्योजकता, पर्यावरणीय बदलांचा सामना करण्यासाठी व पर्यावरण संरक्षण, जलसंधारण, कौशल्य विकास आणि पाणी व्यवस्थापन, आरोग्य, पोषण, उपजीविका इ.संबंधित समस्यांचे निराकरण यासारख्या क्षेत्रात अतुलनीय कार्य केल्याबद्दल तीन राज्यांतील विविध गावांतील दहा महिला परिवर्तनकर्त्यांना ‘प्रेमा गोपालन सखी प्रेरणा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रम संचालक उपमन्यू पाटील म्हणाले, “ज्या प्रेमा ताईने अनेक महिलांच्या जीवनातील आव्हानात्मक अनुभवानंतर धैर्याने आपले जीवन पुन्हा उभे केले करण्यास मदत केली त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण. “त्यांच्या प्रेरणादायी प्रवासाने कृषी, उद्योजकता, स्वच्छ ऊर्जा, आरोग्य सेवा आणि अन्न सुरक्षा यामधील अनेक नंतरच्या उपक्रमांचा पाया घातला गेला.”

प्रमुख पाहुणे सोलापूरचे जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने म्हणाले, ” गेल्या चार वर्षापासून मी पाहिलं आहे की, , महिला या SSP च्या माध्यमातून प्रगती करत आहेत.”

यावेळी मनीषा मिसाळ (तालुका कृषी अधिकारी,उत्तर सोलापूर)यांचीही उपस्थिती होती. त्या म्हणाल्या, “त्यांनी त्यांच्या भावना याप्रसंगी व्यक्त केल्या या जगाचा निरोप घेतल्या नंतर देखील कोणीतरी तिचे काम करत आहे, ही त्यांच्या जीवनातील खूप मोठी गोष्ट आहे, जी अविरतपणे सुरु राहील, हे या कार्यक्रमातून दिसत आहे.

“पद्मश्री” पुरस्काराने सन्मानित आणि “बिजमाता” म्हणून ओळख असलेल्या श्रीमती राहीबाई पोपरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद स्वीकारले. त्यांनी त्यांच्या भाषणात त्याचा जीवनाचा खडतर प्रवास थोडक्यात व्यक्त केला.

एसएसपी संचालक मंडळ, नादराजन व्ही.सी, प्रसन्ना हुलीकवी , पायल रंधवा, यांचीही यावेळी भाषणे झाली. या कार्यक्रमाला समाजातील अनेक महिला कार्यकर्ता, कंपनी प्रतिनिधी आणि सामाजिक क्षेत्रातील इतर दिग्गज उपस्थित होते.
नादराजन व्हीसी सर यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

Back to top button