विठुरायाच्या मंदिरात एक महिना रंगपंचमी | पुढारी

विठुरायाच्या मंदिरात एक महिना रंगपंचमी

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या सावळ्या विठुरायाच्या मंदिरात रंगपंचमीनिमित्त रंगोत्सव साजरा करण्यात आला. पंढरीचा परमात्मा पांडुरंग हा साक्षात श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. त्यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात वसंत पंचमी ते रंगपंचमी असा एक महिना रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. जगाच्या पाठीवर एक महिना रंगपंचमीचा सण साजरा करणारे श्री क्षेत्र पंढरपूर हे एकमेव देवस्थान आहे.

रविवारी मंदिरात व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते विठ्ठलावर रंग उधळण्यात आला. रंगपंचमी सणाच्या निमित्ताने देवाला दररोज पांढरा पोशाख करून देवाच्या अंगावर केशर व गुलाब पाण्याच्या रंगाची उधळण केली जाते. सलग महिनाभर हा दिनक्रम सुरू असतो. अखेरच्या दिवशी अर्थात रंगपंचमीदिनी मंदिराच्या डफाची पूजा करून नामदेव पायरीपासून मिरवणूक काढून मंदिर प्रदक्षिणा करण्यात आली. यमाई तलाव येथेही डीवायएसपी विक्रम कदम, मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्या हस्ते श्री विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन करून रंगपंचमी सोहळ्याला प्रारंभ करण्यात आला.

Back to top button