सोलापूर: कौठाळी येथे भीमा नदीपात्रात शिवराय, श्रीरामाची प्रतिकृती | पुढारी

सोलापूर: कौठाळी येथे भीमा नदीपात्रात शिवराय, श्रीरामाची प्रतिकृती

कौठाळी; पुढारी वृत्तसेवा: येथील भीमा नदी पात्रात मध्यभागी शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू श्रीरामचंद्र या दोन थोर योद्धांच्या प्रतिकृती साकारल्या आहेत. येथील वातावरण शिवमय झाले असून शिवभक्तांचे आकर्षण ठरले आहे.

कौठाळी येथील कलाकार प्रवीण नगरे व सुरज नगरे या बंधुंनी भीमा नदीच्या पात्रामध्ये लोखंडी बॅरलच्या आधारे प्रभू श्रीरामांची १७ फूट उंच, तर छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारूढ मूर्ती उभारली आहे. यासाठी लोखंडी पाईप, पत्रे, बॅरल, थर्माकोल वापरून या दोन्ही प्रतिकृती उभ्या केल्या आहेत. या दोन्ही योद्धांचे पराक्रम हिंदू राष्ट्रासाठी अनमोल आहेत. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज व प्रभू श्रीरामचंद्र यांच्या दर्शनासाठी भोई समाजाच्या वतीने मोफत होडीची व्यवस्था करण्यात आली आहे. दर्शनासाठी आबालवृद्धासह शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली आहे.

हेही वाचा 

Back to top button