

पुढारी ऑनलाईन डेस्क: महाराष्ट्रात आज सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात शिवजंयती साजरी करण्यात येत आहे. याच दरम्यान रयतेच्या राजाला मानवंदना देण्यास मराठी कलाकारदेखील मागे कसे राहतील. मराठी अभिनेत्री रसिका सुनिल, विदूला चौगुले, मायरा वायकूळ, सुबोध भावे यासारख्या अनेक दिग्गज स्टार्सनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून शिव जंयती दणक्यात साजरी केली. यानिमित्ताने चाहत्यांना सोशल मीडियावर भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. ( शिवजयंती २०२३ )
छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील परी म्हणजे, बालकलाकार मायरा वायकूळ होय. मायराने शिवजंयतीनिमित्ताने खास जांभळ्या-लाल कलरच्या नववारी साडीसोबत रेड ब्लॉउजमधील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये मायराने 'छत्रपती श्री शिवाजी महाराज जंयतीनिमित्त सर्वांन्ना शिवमय शुभेच्छा ⛳️'. अशा चाहत्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. यातील एका फोटोत मायराच्या हातात शिवाजी महाराजांची छोटीशी एक मूर्ती दिसत आहे. तर काही फोटोत शिवनेरी गडावर असून तेथील विहंगम चित्र पाहायला मिळतेय. याशिवाय खास करून मायराने साडीवर भगवा फेटा परिधान केलाय. नकात नथ, कपाळावर चंद्रकोर, कानात झुमके, गळ्यात भरजरी दागिने, हातात बांगड्या, मेकअप आणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे.
मराठी अभिनेत्री रसिका सुनिलने शिवजंयतीच्या निमित्ताने एक खास व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने 'शिवजयंती २०२३???'. असे लिहिले आहे. यात रसिकाने मुरूम रंगाची नऊवारी साडी परिधान करून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालून पूजन करताना दिसली आहे. यावेळी हातात पताका घेऊन तर ढोल वाजवून आनंदोत्सव साजरा केला आहे.
या पोस्टमध्ये तिने आज शिवजयंती निमित्त कवि भूषण यांना मानाचा मुजरा…शिवरायांचा चरित्रचंद्र पाहून प्रभावित झालेले कविराज उत्तरेहून दक्षिणेकडील सह्याद्रीचे काटे सराटे तुडवीत येऊन महाराजांना भेटले. त्यांनी शिवराजभूषण नावाचा एक अलंकार शास्त्रावरील ग्रंथ लिहिलेला असून त्यात शिवरायांच्या निरनिराळ्या पराक्रमांचे काव्यमय वर्णन अलंकारीक पद्धतीने आविष्कारित केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि कवींची भेट रायगडावर झाली. ते कवी आहे हे त्यांना समजले आणि त्यांनी म्हटलं, आपण कवी आहात? मला आपलं एखादं छंद ऐकता येईल का? कवी भूषणांनी चटकन म्हटलं.. कवी भूषणांचे हे अप्रतिम छंद ऐकून महाराजांना आनंद झाला, त्यांनी या पाहुण्याचा आदर करून गडावर ठेवून घेतले.
या काळात (म्हणजे सुमारे अडीच वर्ष ) कवी भूषणांनी महाराजांच्या जीवनातील अनेक घटनांचा अन् विशेषत: युद्धप्रसंगांचा वेध घेतला. हे निश्चित आणि त्यांनी महाराजांच्या जीवनावर काव्यरचना करावयास प्रारंभच केला. शिवाबावनी हा ग्रंथ त्याच पुस्तकातील एक भाग आहे असे समजतात. हिंदी साहित्यात चंद्रकृत पृथ्वीराज रासा या ग्रंथाच्या तोडीची मान्यता शिवराजभूषणास आहे. अखंड ३५० वर्षं महाराष्ट्राची प्रेरणा असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावरील भव्य ऐतिहासिक मालिका राजा शिवछत्रपती याचे दिग्दर्शक आणि निर्माते श्री. नितीन देसाई (चंदकांत प्रोडक्शन प्रा. लि.) यांनी या मालिकेचे शीर्षक गीत हाच छंद आहे. तो छंद आपल्या सर्वांचा आवडता आहे… ऐका तर मग…..
कवी भूषणांनी चटकन म्हटलं..
हे राजन, इंद जिम जर्ंभपर। बाधब सांब । रावण सदंभ । रघुकुलराज आहे । पवन बारिबापर। संभू रतिनाहपर । जो सहसबाहपर. रामद्वीराज आहे । दावा दुमदंडपर. चीता मृग झंडपर । भूषण वितुंडपर । जसे मृगराज आहे । तेज तम्पर अंश । कन्जिमि कंसपर । जो म्लेच्छ वंशपर । शेर शिवराज आहे । शेर शिवराज आहे. असे देखील म्हटलं आहे.
मराठी अभिनेत्री विदुला चौगुले हिने शिवजंयतीनिमित्ताने शिव प्रतिमेचे हार घालून पूजन केलं. यावेळी तिने पिंक रंगाच्या नऊवारी साडीवर ब्ल्यू कलरचे ब्लॉऊज परिधान केले होते. या व्हिडिओच्या कॅप्शमध्ये तिने 'निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी…' असे लिहिले आहे. यावेळचा तिचा लूक आकर्षाणाचा केंद्रबिदू ठरला.
याशिवाय मराठी अभिनेता सुबोध भावे, हेमांगी कवी, अपूर्वी नेमळेकर यांनी महारांजाना मानाचा मुजरा करत मानवंदना दिली आहे. सुबोध भावेने फोटोच्या कॅप्शनमध्ये 'मनाचा आणि मानाचा मुजरा राजे???, #शिवजयंती', हेमांगी कवीने 'जाणता राजा… जनतेचा राजा!, छत्रपती शिवाजी महाराज की जय! ??'. आणि अपूर्वा नेमळेकरने निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, जाणता राजा, छत्रपती शिवाजी महाराज, शिवजयंती दिनी विनम्र अभिवादन!!!?. असे लिहिले आहे. ( शिवजयंती २०२३ )
हेही वाचा :