अन् सेल्फी ठरली शेवटची! आंघोळीसाठी गेलेला तरुण वाहून गेला | पुढारी

अन् सेल्फी ठरली शेवटची! आंघोळीसाठी गेलेला तरुण वाहून गेला

कौठाळी (सोलापूर); पुढारी वृत्तसेवा : पोहायला गेलेला एक तरुण गुरसाळे बंधाऱ्यातून वाहून गेला. त्‍याच्‍या शोधासाठी विविध यंत्रणा कार्यरत आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ च्या बायपास मार्गाचे काम सुरू आहे. भीमा नदीवर पुलाचे बांधकाम चालू आहे. या बांधकामावर हुसेन रझा हा तरुण काम करीत होता. तो गुरसाळे बंधाऱ्यावर आंघोळीसाठी गेला होता. यावेळी त्या तरुणासोबत अन्य काही मित्रही आंघोळीसाठी आले होते. अशी माहिती मिळाली आहे. त्याआधी त्यांनी सेल्फीही घेतली होती. पण, दुर्देवाने ही सेल्फी शेवटची ठरली.

हुसेन रझा हा पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीचा तरुण कर्मचारी होता. गुरसाळे बंधाऱ्यात तो आंघोळीसाठी आला. या वेळी बंधारा परिसरात पाण्याचा प्रवाह वेगवान होता. त्यामुळे तो पाण्यात वाहून गेला आहे.

पोलीस तसेच अन्य नागरिक या तरुणाचा शोध घेत आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. शोध मोहीम सुरू आहे. तरुणासोबत अन्य काही मित्रही आंघोळीसाठी आले होते, अशी माहिती मिळाली आहे.

सध्या वीर धरणातून नीरा नदीला सोडलेले पाणी भीमा नदीला येत आहे. त्यामुळे नदी पात्रात जाऊ नये असे आवाहन केले होते. पाटबंधारे विभागासह तालुका महसूल विभाग आणि पोलिसांनीही आवाहन केले होते.

हेही वाचलं का ? 

Back to top button