सोलापूर : मश्रूम गणपती मंदिराच्या २८ तोळे सोन्याच्या कळसाची चाेरी | पुढारी

सोलापूर : मश्रूम गणपती मंदिराच्या २८ तोळे सोन्याच्या कळसाची चाेरी

उत्तर सोलापूर, पुढारी वृत्तसेवा : हिप्परगा (ता. उत्तर सोलापूर) येथील प्रसिद्ध असलेल्या मश्रूम गणपतीच्या मंदिरावरील 28 तोळे वजनाचा सोन्याचा कळस बुधवारी पहाटे चोरी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावरून भेट देऊन पाहणी केली. ऐन गणेशोत्सवाच्या काळात मध्यरात्री मंदिराचा सोन्याचा कळस चोरीला गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यापूर्वीदेखील २०१६ मध्ये याच गणपतीच्या मंदिरावरील कळस चोरीला गेला होता.

सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वरांनी या मश्रूम गणपतीची स्थापन केली होती. या मंदिरावर सोन्याचा कळस भाविकांच्या वर्गणीतून  बसवण्यात आला होता. 25 किलो वजनाच्या कळसावर 28 तोळे सोन्याचा मुलामा चढवला आहे. मश्रूम गणेश मंदिराचे पुजारी संजय किसनराव पतंगे पहाटे मंदिरात आल्यावर त्यांना कळस चोरीला गेल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी याची माहिती पोलिसात दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तात्‍काळ घटनास्थळी भेट देऊ पाहणी केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्ह्य  नोंद करण्यात आला आहे.

बुधवारी (दि.31) मध्यरात्री एक ते साडेतीनच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी श्री मश्रूम गणपती मंदिरावरील स्थापित असलेला पंचधातूचा कळस चोरी केला. दोन वेळा मंदिरावरील कळस चोरीला गेल्‍याने मोठी खळबळ उडाली आहे. दुसऱ्यांदा कळस चोरीला गेल्याने मंदिराच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. तसेच मंदिराबाबत अशा वारंवार घटना घडत असल्याने भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्‍यामूळे या चोरटयांचा लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी भाविकांनी केली आहे.

हेही वाचा 

सांगली : जिवंत व्यक्‍ती मृत दाखवून वारस नोंद 

चक्क लेहेंगा बटणांमध्ये लपवले ४१ लाख, दुबईला जाणाऱ्या प्रवाशाला दिल्ली विमानतळावर अटक (व्हिडिओ) 

बेळगाव : दारू प्याले अन् बारमालकाला दिल्या लहान मुलांच्या खेळण्यातील नोटा, तिघांना अटक 

Back to top button