कोळींना थेट राज्यावर संधी | पुढारी

कोळींना थेट राज्यावर संधी

सध्या राज्यात झालेल्या राजकीय सत्तांतरानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. यामध्ये मूळ शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अशी शिवसेनेची विभागणी झाली आहे. नैसर्गिक नियमाप्रमाणे सत्तेसाठी सर्वकाही म्हटल्याप्रमाणे बरीच मंडळी सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे झुकली आहेत. त्यामुळे मूळ शिवसेनेकडे ओढा कमी असतानाही सोलापूर जिल्ह्यातील शरद कोळी यांनी शिवसेनेला ताकद देण्याचा मानस व्यक्त करत शिवसेनेत मोठ्या शक्‍तिप्रदर्शनानुसार प्रवेश केला आहे. सरीकडे शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्य शिवसेना मेळाव्यातही मोठे शक्‍तिप्रदर्शन केले होते. याची पोहोचपावती म्हणून त्यांना थेट युवा सेनेच्या राज्याच्या विस्तारकपदाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एका शिवसैनिकावर शिवसेनेने राज्याची जबाबदारी देऊन मोठा विश्‍वास दाखविला आहे. तो विश्‍वास आता शरद कोळी सार्थ ठरविणार का, असा प्रश्‍न पुढे येत आहे.

शरद कोळी यांनी यापूर्वीही शिवसेनेत काम केले होते. त्यानंतर त्यांनी धाडस सामाजिक संघटनेची दु स्थापना करून राज्यभरात जवळपास 5 हजार शाखा स्थापन केल्या आहेत. त्या माध्यमातून राज्यभरात हजारो-लाखो युवकांचे संघटन केले आहे. मात्र, संघटनेच्या माध्यमातून समाजकारण आणि राजकारण होणार नाही, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांच्या माध्यमातून त्यांनी थेट ‘मातोश्री’ गाठली आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीतच हातात ‘शिवबंधन’ बांधले. त्यानंतर त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न करता थेट कामाला सुरुवात केली. शिवसेनेची पडझड झाली असून त्याला राज्यभरात सावरण्याचा मनोदय व्यक्त करत युवकांचे संघटन वाढविण्यावर आपला भर असेल, असे सांगत त्यांनी शिवसेनेच्या कामाला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी सांगोला येथे झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात त्यांनी सचिव विनायक राऊत यांच्यासमोर मोठे शक्तीप्रदर्शन केले. यावेळी जवळपास शंभर ते दीडशे चारचाकी गाड्यांचा ताफा घेऊन त्यांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांच्या पाठीशी असणार्‍या युवकांच्या संघटनेची जाणीव शिवसेना नेत्याला झाली खरी; मात्र यामध्ये मूळ शिवसेनेतील अनेक मातब्बर पदाधिकारी मात्र फिक्के पडले.

कोणत्याही जिल्हाप्रमुखांना पाच-पंचवीस गाड्यांची व्यवस्था करणे या शिवसेनेच्या मेळाव्यासाठी जमले नाही, ते कसब कोळी यांच्यासारख्या नवख्या कार्यकर्त्याने करून दाखवले. याची चांगलीच दखल शिवसेना सचिव खा. विनायक राऊत यांनी घेतली. त्यांनी तातडीने युवा सेनेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि मेळाव्याच्या भाषणातच शरद कोळी यांना युवा सेनेच्या राज्य विस्तारकपदाची जबाबदारी देण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शिवसेना नेत्यांचे डोळ विस्फारले आहेत, तर काहींच्या चेहर्‍यावरील तेजच निघून गेले. सचिव खा. विनायक राऊत यांनी आता कोळी यांना राज्यभरात आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी आता राज्यभरात दौरे करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

दुसरीकडे शिवसेना नेत्यांनी आपल्याला दिलेल्या जबाबदारीची संपूर्ण जाणीव असून जिल्ह्यातील आणि राज्यातील नेत्यांना विश्‍वासत घेऊन युवा सेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकाला, युवकांना, शेतकर्‍यांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील तसेच सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आता थेट रस्त्यावर उतरून सरकारविरोधात आंदोलन करण्याची तयारी कोळी यांनी ठेवली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका शिवसैनिकाला पहिल्यांदाच राज्यस्तरावर काम करण्याची संधी शिवसेनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. त्यामुळे कोळी यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, विनायक राऊत यांच्याशी एकनिष्ठ राहून काम करणार असल्याचे ही सांगितले आहे.

रस्त्यावर लढण्याची तयारी

जिल्ह्यातील अनेक शिवसेना नेत्यांचे डोळे विस्फारले आहेत. काहींच्या चेहर्‍यावरील तेजच निघून गेले. सचिव खा. विनायक राऊत यांनी, आता कोळी यांना राज्यभरात माजी मंत्री तथा युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे त्यांनी आता राज्यभरात दौरे करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दुसरीकडे शिवसेना नेत्यांनी आपल्याला दिलेल्या जबाबदारीची संपूर्ण जाणीव असून जिल्ह्यातील आणि राज्यातील नेत्यांना विश्‍वासत घेऊन युवा सेना आणि शिवसेनेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकाला, युवकांना, शेतकर्‍यांना न्याय देण्याचा आपला प्रयत्न राहील तसेच सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आता थेट रस्त्यावर उतरुन सरकारविरोधात आंदोलन करण्याची तयारी कोळी यांनी ठेवली आहे. त्यामुळे शरद कोळी यांना आता राज्यभरात काम करण्याची संधी निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एका शिवसैनिकाला पहिल्यांदाच राज्यस्तरावर काम करण्याची संधी शिवसेनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन दिली. त्यामुळे कोळी यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, विनायक राऊत यांच्याशी एकनिष्ठ राहून काम करणार असल्याचे सांगितले आहे.

Back to top button