सोलापूर : शहरात गणेश मंडळांना परवाना देण्यासाठी पोलिस आयुक्तालयात एक खिडकी योजना सुरू | पुढारी

सोलापूर : शहरात गणेश मंडळांना परवाना देण्यासाठी पोलिस आयुक्तालयात एक खिडकी योजना सुरू

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  गणपती उत्सव 10 दिवसावर येवून ठेपला आहे. त्यासाठी पोलिसांनी तयारी सुरू केली आहे. शहरातील 7 ही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणे त्यांच्या अडचणी समजावून घेणे यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. गणपती मंडळांना एकाच छताखाली परवानगी मिळावी, यासाठी पोलिस आयुक्तालयात काल (सोमवार) पासून एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी सांगितली.

शहरातील गणेश उत्सव मोठ्या उत्साहात व शांतता आणि सुव्यवस्था अबाधीत राखुन करण्यात येणार आहे. यासाठी आज (मंगळवारी) शहरातील सर्व मध्यवर्ती मंडळांच्या पदाधिकार्‍यांसोबत पोलिस आयुक्तालयात मंगळवारी सकाळी 11 वाजता शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या शिवाय 7 ही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मध्यवर्ती मंडळे, उत्सव पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य यांच्यासोबत बैठक घेण्यासाठी सहाय्यक पोलिस आयुक्‍त व पोलिस निरीक्षक यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्यात 25 पोलिस स्टेशन आहेत. त्या अंतर्गत उपविभागीय स्थरावर सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच जिल्ह्यात एक गांव एक गणपती हा उपक्रम जास्त प्रमाणात राबविण्यात येणार आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 300 पेक्षा जास्त एक गांव एक गणपती बसविण्यात येतात. यावर्षी त्यापेक्षा आणखी गावांमध्ये हा उपक्रम राबविण्याचा ग्रामीण पोलिसांचा मानस आहे.
– तेजस्वी सातपुते, पोलिस अधीक्षक

शहरातील गणपती मंडळांनी सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर द्यावा. पर्यावरणपुरक उत्सव साजरा करावा. यासाठी शहरातील गणेश मंडळांना विनंती करण्यात येणार आहे. .
डॉ. वैशाली कडूकर
पोलिस उपायुक्‍त

Back to top button