सोलापूर : पालखी दर्शनासाठी कुचन प्रशालेत गर्दी | पुढारी

सोलापूर : पालखी दर्शनासाठी कुचन प्रशालेत गर्दी

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा :  कुचन प्रशालेत सालाबादप्रमाणे श्री गजानन महाराज पालखीचे आगमन झाल्यावर दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडाली. पालखीचा या प्रशालेत एक दिवस मुक्काम असतो.

संस्थेतर्फे या पालखीचे व वारकर्‍यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ गड्डम, सचिव दशरथ गोप, विश्‍वस्त पांडुरंग दिड्डी, श्रीधर चिट्ट्याल, दिनेश यन्नम, व्यंकटेश आकेन, गणेश गुज्जा, विजयकुमार गुल्लापल्ली, रमेश केदारी, रमेश बोद्धूल, श्रीनिवास कटकूर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले.

यावेळी प्राचार्य युवराज मेटे, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, उपमुख्याध्यापक तुकाराम श्रीराम, पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू, जाहिदा जमादार, मल्लिकार्जुन जोकारे उपस्थित होते. कलाशिक्षक गणेश तडका यांनी प्रवेशद्वाराजवळ गजानन महाराजांचे चित्र, तर गौरी मिरजकर व नितीन मिरजकर यांनी गजानन महाराजांची रांगोळीतून प्रतिमा साकारली.

पालखीवर पाकळ्यांची उधळण

अंबिका नवरात्री महोत्सव व्यापारी मंडळ बहुउद्देशीय संस्थेतर्फे गजानन महाराज पालखीचे अंबिका चौक, कस्तुरबा मार्केट येथे गुलाब पाकळ्यांची उधळण करुन स्वागत करण्यात आले. यावेळी सर्व वारकर्‍यांना मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे प्रमुख राजा काकडे, ट्रस्टी अध्यक्ष सुधीर भिंगारे, शिव हिरेमठ, उत्सव अध्यक्ष हिंगमिरे, सुरेश घोडके, पिंटू नरवणे, सिद्धाराम कौंचे, मल्लिनाथ बिज्जरगी, श्याम आकाशे, श्रीकांत खबाले, राजू काळे, चेतन पटेल, गणेश होटकर, बनशंकरी तेल्लूर आदी उपस्थित होते.

Back to top button