सोलापूरकरांच्या अंगाची लाही लाही | पुढारी

सोलापूरकरांच्या अंगाची लाही लाही

सेालापूर : पुढारी वृत्तसेवा :  शहर व जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शुक्रवारी हा तापमानाचा पारा 42 अंशांवर चढला होता. उन्हाची दाहकता वाढल्याने अबाल वृद्धांना त्याचा त्रास जाणवू लागला आहे, तर उन्हाची तीव्रता अधिक असल्याने सोलापूरकरांच्या अंगाची लाही लाही झाली.

भर उन्हात घराबाहेर पडणार्‍यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे. शहर व जिल्ह्यात काही दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत चालली आहे. पहाटेच्या सुमारास थंडी आणि दुपारनंतर तीव्र उन्हाचा तडाखा जाणवत आहे. त्यामुळे कामासाठी बाहेर पडणार्‍यांनी डोक्यावर टोपी, स्कार्फ आणि पाण्याची बाटली सोबत घ्यावे असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. वारंवार घामाच्या धारा शरीरातून निघत असल्याने शरीरातील पाण्याची पातळी समप्रमाणात राखण्यासाठी गरजेनुसार पाणी पिण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे. यापुढे एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत तपमानाचा हा पारा सातत्याने वाढतच जाणार आहे.

उन्हाच्या दाहकतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी आता एसी, फॅन आणि कुलर दुरुस्तीची कामे हाती घेतली आहे.पत्र्याची घरे असणार्‍यांना मोठा त्रास होणार असल्याने नागरिकांनी आता वेगवेगळ्या उपाययोजना शोधल्या आहेत. उन्हात फिरताना शरीरात वाढलेली उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी नागरिक रस्त्याच्याकडेला विक्रीसाठी असलेल्या कलिंगड आणि नारळ पाण्याचा अस्वाद घेत आहेत, तर येत्या दोन महिन्यांत तपमानाचा पारा सार्वाधिक उच्चांक गाठणार आहे.

त्यामुळे वातावरणात अनपेक्षित बदल होतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. बुधवारी तपमानाचा कमाल पारा 41.6 तर किमान 22.1 अंशावर स्थिरावला होता. बुधवार 16 मार्च रोजी कमाल तपमान 41 अशांवर तर किमान 21.4 अंशावर स्थिरावले होते. मंगळवार, दि. 15 मार्च रोजी कमाल तपमान 39.3 अंशावर तर किमान 19.7 अंशावर स्थिरावले होते. सोमवार, दि. 14 मार्च रोजी तमपानाचा कमाल पारा 38.4 अंशावर तर किमान 22.1 अंशावर स्थिरावला हेाता. यंदा लवकरच सूर्यनारायण आग ओकण्यास सुरुवात केल्याने चार ते पाच दिवसांपासून सातत्याने तापमानात वाढ होत आहे. यंदा तपमानाची उच्चांकी नोंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, ज्येष्ठ नागरिक आणि वयस्कर लोकांनी विनाकामाचे बाहेर पडू नये, लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

पडणार्‍यांनी डोक्यावर टोपी, स्कार्फ आणि पाण्याची बाटली सोबत घ्यावे असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. वारंवार घामाच्या धारा शरीरातून निघत असल्याने शरीरातील पाण्याची पातळी समप्रमाणात राखण्यासाठी गरजेनुसार पाणी पिण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे. यापुढे एप्रिल आणि मे महिन्यापर्यंत तपमानाचा हा पारा सातत्याने वाढतच जाणार आहे. उन्हाच्या दाहकतेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी आता एसी, फॅन आणि कुलर दुरुस्तीची कामे हाती घेतली आहे.पत्र्याची घरे असणार्‍यांना मोठा त्रास होणार असल्याने नागरिकांनी आता वेगवेगळ्या उपाययोजना शोधल्या आहेत.

उन्हात फिरताना शरीरात वाढलेली उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी नागरिक रस्त्याच्याकडेला विक्रीसाठी असलेल्या कलिंगड आणि नारळ पाण्याचा अस्वाद घेत आहेत, तर येत्या दोन महिन्यांत तपमानाचा पारा सार्वाधिक उच्चांक गाठणार आहे.त्यामुळे वातावरणात अनपेक्षित बदल होतील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. बुधवारी तपमानाचा कमाल पारा 41.6 तर किमान 22.1 अंशावर स्थिरावला होता. बुधवार 16 मार्च रोजी कमाल तपमान 41 अशांवर तर किमान 21.4 अंशावर स्थिरावले होते. मंगळवार, दि. 15 मार्च रोजी कमाल तपमान 39.3 अंशावर तर किमान 19.7 अंशावर स्थिरावले होते. सोमवार, दि. 14 मार्च रोजी तमपानाचा कमाल पारा 38.4 अंशावर तर किमान 22.1 अंशावर स्थिरावला हेाता. यंदा लवकरच सूर्यनारायण आग ओकण्यास सुरुवात केल्याने चार ते पाच दिवसांपासून सातत्याने तापमानात वाढ होत आहे. यंदा तपमानाची उच्चांकी नोंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, ज्येष्ठ नागरिक आणि वयस्कर लोकांनी विनाकामाचे बाहेर पडू नये, लहान मुलांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

चार दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ

शहर व जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत चालली आहे. गेल्या चार दिवसांत अनुक्रमे 38.4, 39.3, 41.0, 42 अंश अशा टप्प्याटप्याने तापमानात वाढ होत चालली आहे. एप्रिल व मे महिन्यात तापमानाचा पारा उच्चांक गाठणार असल्याचा अंदाज पुणे हवामान खात्याने वर्तविला आहे.

Back to top button