सोलापूर :  कोरोना निर्बंधमुक्तीला लसीकरणाचा अडथळा | पुढारी

सोलापूर :  कोरोना निर्बंधमुक्तीला लसीकरणाचा अडथळा

सोलापूर :  पुढारी वृत्तसेवा : राज्य शासनाने काही जिल्हे कोरोना निर्बंधमुक्त केले. यातून सोलापूरला मात्र वगळण्यात आले आहे. जिल्हा निर्बंध मुक्तीसाठी लसीकरणाचा कमी टक्का अडथळा ठरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा पॉझिटिव्हिटी रेट हा किमान 10 टक्क्यांपर्यंत असावा.जिल्ह्यातील विविध हॉस्पिटलमध्ये किमान 40 टक्के बेड उपलब्ध असावेत, जिल्ह्यातील एकूण नागरिकांपैकी 90 टक्के लोकांनी पहिला, तर जवळपास 70 टक्के लेाकांनी दुसरा डोस घेणे अपेक्षित होते. हे निकष अनेक जिल्ह्यांतील कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे कमी करण्यात आले आहेत. सोलापूर जिल्ह्याचा त्यात समावेश होऊ शकला नाही. त्यामुळे प्रशासनाने आता लसीकरणासाठीची मोहीम पुन्हा एकदा तीव्र केली आहे. त्यामुळे शंभरकर यांनी आरोग्य कर्मचारी, बचत गटांच्या महिलांना लस न घेणार्‍यांची यादी तयार करून. लसीकरणासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले आहे.

आतापर्यंत जिल्ह्यातील जवळपास 24 लाख 17 हजार 841 जणांनी पहिली, तर 16 लाख 96 हजार 489 जणांनी कोरोना प्रतिबंधक लसीची दुसरी मात्रा घेतली आहे. एकूण 18 हजार 395 जणांनी प्रीकॉशन डोस घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 41 लाख 32 हजार 725 जणांनी लस घेतली आहे. शहरी भागातील 6 लाख 61 हजार 287 जणांनी पहिला, तर 4 लाख 70 हजार 948 लोकांनी दुसरा डोस घेतला आहे, तर 14 हजार 124 जणांनी प्रिकॉशन डोस घेतला आहे.

आतापर्यंत 30 लाख 79 हजार 128 लोकांनी पहिला, तर 21 लाख 67 हजार 437 जणांनी दुसरा डोस घेतलेला आहे. दुसरा डोस 67 टक्के लोकांनी घेतला आहे. त्यामुळे उर्वरित लोकांनी तत्काळ लसीकरण करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांचा प्रतिसाद कमीच
प्रीकॉशन डोस 32 हजार जणांनी घेतला
शहर-जिल्ह्यात लसीकरण मोहीम प्रशासन तीव्र करणार

जिल्ह्यातील 34 लाख 14 हजार 400 पैकी 30 लाख 79 हजार 128 जणांनी पहिला तर 21 लाख 67 हजार 437 जणांनी दुसरा डोस घेतला आहे.
मुबलक लस उपलब्ध

कोरोना निर्बंध पूर्णपणे हटविण्यासाठी केवळ लसीकरणाचा काही टक्का कमी पडला आहे. तो पूर्ण झाला की निर्बंध पूर्णपणे हटवता येतील.
– मिलिंद शंभरकर
जिल्हाधिकारी, सोलापूर

Back to top button