सातारा जिल्ह्यात 293 गावे इको सेन्सेटिव्ह | पुढारी

सातारा जिल्ह्यात 293 गावे इको सेन्सेटिव्ह

आदेश खताळ

सातारा :  राज्यातील पश्चिम घाटातील वैश्विक जैवविविधतेचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी केंद्रीय पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यादृष्टीने केंद्र सरकारने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. या समितीच्या अहवालानुसार सातारा जिल्ह्यातील 293 गावांचा इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये समावेश करण्यात येणार आहे. यावर केंद्र शासनाने सूचना मागवल्या असून, लवकरच निर्णय घेेणार आहे.

राज्यातील पश्चिम घाटास विशेष भौगोलिक महत्त्व आहे. या घाट क्षेत्रात कृष्णा, गोदावरी, कावेरीसह अनेक प्रमुख नद्यांचा उगम झाला आहे. पश्चिम घाट वैश्विक जैवविविधतेच्यादृष्टीने महत्त्वाचा भाग असून, त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर वन्यजीवसंपदा आहे. या परिसरात विविध प्रकारचे सस्तन व उभयचर प्राणी तसेच शेकडो पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात. देशाच्या एकूण जैवविविधतेपैकी 25 टक्के जैवविविधता पश्चिम घाटात आढळते. दरवर्षी अनेक प्राणी व वनस्पतींच्या प्रजाती पश्चिम घाटात सापडतात. त्यामुळे पश्चिम घाट हा प्राकृतिक वारसा असल्याने त्याचा कास पठारासारखा काही भाग युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणूनही घोषित केला आहे.

हा प्रदेश विविध दूर्मिळ पशु-पक्षी, वन्यजीवसंपदेसोबतच कोट्यवधी लोकांचे रहिवास क्षेत्र आहे. या प्रदेशातील जैवविविधता अबाधित राहणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने पश्चिम घाटातील परिस्थिती, वातावरणीय बदल, साकल्यवादी विकास, जैवविविधता यादृष्टीने अभ्यास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती गठीत केली. विकासात पर्यावरण जैवविविधता आबाधित ठेवणे महत्वाचे असल्याने त्या परिसरातील नारिकांच्या अपेक्षा आणि उपाय यांचा विचार करून पश्चिम घाटातील संवेदनशीलतेचा र्‍हास रोखण्यासाठी उपाययोजना सुचवणे आवश्यक होते. गेली दहा वर्षांपासून ही प्रक्रिया सुरु आहे. उच्चस्तरीय समितीने महाराष्ट्रासह सहा राज्यांचा अहवाल त्या त्या राज्यांना सादर केला असून सूचना मागवल्या. त्यानुसार केंद्र शासनाने एक नोटिफिकेशन प्रसिध्द केले आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सातारा, महाबळेश्वर, पाटण, जावली व कोरेगाव तालुक्यातील 293 गावे इको सेन्सेटिव्ह म्हणून निश्चित करण्यात येणार आहे.

जावली तालुक्यातील 118 गावांचा इको सेन्सेटिव्ह गावांच्या यादीत समावेश आहे. त्यामध्ये बोंडारवाडी, भूतेघर, वहिते, येरणे बु॥, वाळंजवाडी, उंबरी, येरणे खुर्द, मांजरेवाडी, आचळी, देवसरे, जरेवाडी, कुरळोशी, हातगेघर, सौंदरी, सायघर, कुराशी, दभेमोहन, भालेघर, सोनट, कलमगाव कळमकर, दाभे दाभेकर, दाभेतुरुक, ओखवडी, शिरनार, लाखवड, कोट्रोशी, भोगवली तर्फ मेढा, खांबील पोकळे, अमशी, रंगेघर, दिवदेव, मामुर्डी, कंडट, वरसोली कोळी, गालदेव, खांबील चोरगे, खारोशी, वादगरे, सोनगाव, दरे बु॥, रेणोशी, झडनी, हरचंदर, म्हाते खुर्द, मोहट, गोंडेमाळ, वेंगळे, बेलवडे, रुळे, पाली तर्फ आटेगाव, दोडनी, गंजे, आपटी, गावढोशी, मरडमुरे, आगलावेवाडी, सलोशी, उचाट, फुरुस, कुंभारगणी, आवलन, मोरघर, महामुलकरवाडी, लामज, वळणे, तांबी तर्फ मेढा, मोरावळे, वळवन, सांगवी तर्फ मेढा, निवळी, नरफदेव, पर्वत तर्फ वाघवले, अहीरे, तेटली, मालेश्वर, मालचौंडी, निझरे, गाढवली, ढाणकवाडी, अकल्पे, करंडी तर्फ मेढा, कोळघर, सावरी, सायली, आरव, मोरनी, दुंद, येकीव, शिंदी, आंधरी, कास, म्हावशी, चकदेव, पिंपरी तर्फ तांब, म्हाळुंगे, रावंडी, मेट शिंदी, माजरे शेवंडी, फळणी, आडोशी, मडोशी, खिरखंडी, कुसापूर, मुनावळे, उंबरवाडी, कारगाव, मेट इंदवली, तांबी, वासोटा, मालदेव, कुसवडे, ताकवली, देऊर, पाली तर्फ तांब, वेळे, सवरत, जुमगती, जांब बु॥ या गावांचा समावेश आहे.

कोरेगाव तालुक्यातील राऊतवाडी, गुजरवाडी तर महाबळेश्वर तालुक्यातील 39 गावांमध्ये क्षेत्र महाबळेश्वर, जावली, दरे, अवकळी, नाकिंदा, महाबळेश्वर, रनाद्वागौड, कंभरोशी, मेटगुताड, हरोशी, दुधोशी, पेतपर, परसोंड, मेटतळे, भेकवली, कुमठे, परपर, बिरवडी, शिरवली, शिंडोला, नवळी, मालूसर, बिरमनी, मांघर, टेकवली, हातलोट, दुधगाव, गोरोशी, परुट, चिखली, येरंडल, चतुरबेट, घावरी, धारदेव, झांझवड, देवळी, विवर, घोनसपूर, कलमगाव, तळदेव या गावांचा समावेश आहे.

पाटण तालुक्यातील 91 गावे इको सेन्सेटिव्ह असून त्यामध्ये मालोशी, कुसवडे, कुसशी, डिचोली, निवडे, शिरशिंगे, तोंडोशी, भारसाखळे, ढोकावळे, वन, ढोरोशी, निवकणे, मरळोशी, अरळ, काठी, दिवशी खुर्द, पुनवळी, गावडेवाडी, मणदुरे, झडोली, किसरुळे, गोजेगाव, नवजा, चाफोली, धुईलवाडी, मेंढोशी, मिरगाव, घानव, वाटोळे, तोरणे, नहिंबे, हुंबरळी, पडळोशी, अंबनवे, वाजेगाव, घाटमाथा, केर, कमरगाव, धायटी, खरडवाडी, गोकुळ तर्फ हेळवाक, करवत, बोंदरी, गाढवखोप, घेरदातेगड, शिवंडेश्वर, नानेल, केमसे, मारुल तर्फ पाटण, बोपोली, रासाटी, थानकळ, बाजे, मस्तेवाडी, नेचळ, हेळवाक, मेंढेघर, कोंढावले, वांझोळे, वघने, गोवारे, चाफेर, काडोली, झकडेे, तळीये, मनेरी, पाथरपुंज, कोळने, रिसवड, नाटोशी, गोठने, बहे, मळा, अंबराग, पाचगणी, आटोळी, कळकेवाडी, हणबरवाडी, कोडळ, कहीर, आसवलेवाडी, हुंबरने, पळशी, पानेरी, कारळे, रुवले, सातर, घोटील, निवी, कासाणी यांचा समावेश आहे.

सातारा तालुक्यातील 25 गावांमध्ये चिंचणी, गोगावलेवाडी, आकले, कामथी तर्फ सातारा, आगुंडेवाडी, पारंबे, जोतीबाचीवाडी, अटाळी, सावली, भांबवली, कुरुलबाजी, यवतेश्वर, पाटेघर, कातवडी खुर्द, नावली, केळवली, नित्रळ, ताकवली, कुस खुर्द, खाडेगाव, सांडवली, चाळकेवाडी, ठोसेघर, रायघर, बोपोशी या गावांचा समावेश आहे. तर वाई तालुक्यातील 18 गावांमध्ये जांभळी, घेरकेळंजा, येरुळी, कोचळेवाडी, खावली अभेपुरी, दुईचीवाडी, चोराचीवाडी, किरोंडे, जोर, कोंढावले, गोळेगाव, उळुंब, बलकवडी, आसगाव, नांदगणे, परतवडी, जांभूळाने या गावांचा समावेश आहे.

पर्यावरण संरक्षक कायद्यानुसार केंद्र व राज्य सरकारवर विशेष जबाबदारी देण्यात आली आहे. इको सेन्सेटिव्ह भाग निश्चित करण्यासाठी 2014 साली पहिली अधिसूचना काढण्यात आली होती. मात्र, त्यापूर्वीच केरळ राज्याने इको सेन्सेटिव्ह प्रदेशाबाबत सर्व्हे केला होता. त्यामुळे इको सेन्सेटिव्हमधून आपल्या राज्याचा भाग वगळावा अशी सूचना केली होती. इको सेन्सेटिव्ह भाग असलेल्या 6 राज्यांचा समावेश करण्यात आल्यावर 2018 साली पुन्हा अधिसूचना काढून सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या. राज्यांनी केलेल्या सुचनांचा विचार करुन केंद्र सरकारने पुन्हा सुधारित नोटिफिकेशन काढून सुचना, हरकती मागवल्या आहेत.

Back to top button