सातारा गुन्हे शाखेकडून म्‍हसवड मध्ये कोट्‍यवधींचा गांजा जप्त | पुढारी

सातारा गुन्हे शाखेकडून म्‍हसवड मध्ये कोट्‍यवधींचा गांजा जप्त

सातारा; पुढारी वृत्तसेवा म्हसवड पोलिस स्टेशन पासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणार खडकी येथील शेतकरी कुंडलीक खांडेकर यांनी त्यांच्या मकवानाच्या पिकात तब्बल एक कोटी रूपये किमतीची गांजाची झाडे लावली होती. सातारा स्थानिक गुन्हे शाखेने (सोमवार) रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान छापा टाकून ही गांजाची झाडे जप्त करण्याची कारवाई केली. दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या म्हसवड परिसरात गांजाची शेती होत असल्याने या सर्व प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. सातारा गुन्हे अन्वेषण विभागाने म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीत गेल्या सहा महिन्यात ही तिसरी कारवाई केली.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, म्हसवडच्या एका शेतात गांजाची मोठ्या प्रमाणात लागवड झाली असल्याची माहिती अज्ञात खबऱ्यांकडून मिळाली होती. सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने म्हसवड पोलीस स्टेशन पासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या लोणार खडकी या ठिकाणी मकवानाच्या शेत पिकात लावलेला तब्बल एक कोटी रुपये किमतीच्या गांजाची झाडे गुन्हे अन्वेषण विभागाने जप्त करून ती ताब्यात घेतली. सोमवारी रात्री बारा वाजेपर्यंत ही कारवाई सुरू होती.

हेही वाचा :  

Back to top button