एवढा संताप आलाय की, तलवारीने एका एकाची मुंडकी छाटावीशी वाटतात : उदयनराजे भोसले | पुढारी

एवढा संताप आलाय की, तलवारीने एका एकाची मुंडकी छाटावीशी वाटतात : उदयनराजे भोसले

सातारा; पुढारी वृत्तसेवा : एवढा संताप आलाय की तलवारीने एका एकाची मुंडकी छाटावीशी वाटतात, असा संताप खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. रायगड आक्रोश आंदोलनासाठी ते आज (दि.२) रायगडाला रवाना झाले. त्यावेळी ते बोलत होते.

छत्रपती उदयनराजे भोसले यांनी रायगडला जाण्यापूर्वी जलमंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला वंदन करून प्रवासाला सुरुवात केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजे यांनी राज्यकर्त्यांवर नाव न घेता संताप व्यक्त केला. मला कोणाचा फोन आला नाही. मला कोणाची परवा नाही, असे वाटतंय एका एकाची मुंडकी छाटावी, असा संताप त्यांनी यावेळी व्यक्त केला. जलमंदिरच्या परिसरात शेकडो शिवभक्त उदयनराजे यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवरायांच्या अवमानप्रकरणी राज्यकर्ते व सत्ताधार्‍यांवर निशाणा साधला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button