आ. रामराजे, खा. श्रीनिवास पाटील राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर | पुढारी

आ. रामराजे, खा. श्रीनिवास पाटील राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर

सातारा; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक- निंबाळकर व सातारा लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील यांची वर्णी लागली आहे. नूतन कार्यकारिणीच्या निवडी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी गेल्या काही महिन्यांपूर्वी बरखास्त करण्यात आली होती. गत आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी खा. शरद पवार यांची फेरनिवड करण्यात आली आहे. त्यानंतर आता पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर व सातारा लोकसभेचे खासदार श्रीनिवास पाटील यांची वर्णी लागली आहे. त्यांच्याबरोबरच महाराष्ट्रातून खा. सुनिल तटकरे, खा. सुप्रिया सुळे, आ. अजितदादा पवार, डॉ. फौजीया खान, आ. जितेंद्र आवाढ, वंदना चव्हाण, खा. अमोल कोले यांच्यासह अन्य पदाधिकार्‍यांची राष्ट्रीय कार्यकारिणीवर वर्णी लागली आहे.

Back to top button