महाबळेश्वरचा लिंगमळा धबधबा ओसंडला; पर्यटक धुक्यात हरवले | पुढारी

महाबळेश्वरचा लिंगमळा धबधबा ओसंडला; पर्यटक धुक्यात हरवले

महाबळेश्वर : पुढारी वृत्तसेवा : चिंब पावसानं रानं झालं आबादानी…. पाऊस आला की, मनात कितीतरी पावसाची गाणी दाटून येतात. येणारा प्रत्येक पाऊस मनात एक आनंद घेऊन येतोच. हळुवार दाटती मेघ नभी, हळुवार पसरतो गारवा… सर्वांग फुलवे आगमनाने, भरून वाहतो मनी… स्पर्श नवा.. हर्ष नवा…. असेच वर्षा पर्यटनाचे एक हक्काचे व सुरक्षित ठिकाण म्हणून महाबळेश्वर प्रसिद्ध  (Lingmala) आहे.

सध्या महाबळेश्वर येथील प्रसिद्ध लिंगमळा  (Lingmala) धबधबा पर्यटकांना खुणावत असून उंचावरून ओसंडून वाहणारा हा धबधबा पर्यटकांना जणू साद घालत आहे. मुसळधार पावसाने लिंगमळा धबधब्याचे नयनरम्य व विलोभनीय रूप पाहावयास मिळत आहे. दाट धुकं, वारा अन् निवांत वेळ घालविण्यासाठी पर्यटकांची पावले या ठिकाणी वळत आहेत. कुणी आपल्या साथीदारासोबत सेल्फी घेत आहेत. तर कुणी चिंब भिजत आहेत. येथे भेट देणारा पर्यटक हा अशा निसर्गरम्य, धुंद वातावरणाची अनुभूती घेताना दिसत आहे.

वनविभागाच्यावतीने विशेष अशी व्यवस्था करण्यात आल्याने सर्वात सुरक्षित ठिकाणी म्हणून लिंगमळा धबधब्याकडे पर्यटकांची रेलचेल पाहावयास मिळत आहे. वर्षा पर्यटनासाठी लिंगमळा धबधबा हा महाबळेश्वर पर्यटनास येणाऱ्यांसाठी बेस्ट ऑप्शन म्हणावा लागेल.

पाहा व्हिडिओ 

हेही वाचलंत का ? 

Back to top button