बदलत्या जीवनशैलीत निरामय आरोग्य महत्त्वाचे : जोशी | पुढारी

बदलत्या जीवनशैलीत निरामय आरोग्य महत्त्वाचे : जोशी

सातारा : पुढारी वृत्तसेवा बदलत्या जीवनशैलीत निरामय आरोग्य महत्वाचे असून, त्यासाठी प्रत्येकाने सूर्यनमस्कार व प्राणायाम करावे, असे प्रतिपादन वनवासी कल्याण आश्रमचे बा. ग. जोशी यांनी केले. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज थोरले नगर वाचनालय व योग विद्याधाम यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित योग महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष अजित कुबेर, उपाध्यक्ष अतुल दोशी, कार्यवाह वैदेही कुलकर्णी, संचालक डॉ. शाम बडवे, ज्योत्सना कोल्हटकर, डॉ. राजेंद्र माने, डॉ. वैशाली भोसेकर, योग विद्याधामच्या शैलजा ठोके, प्रल्हाद पार्टे उपस्थित होते. यावेळी योग शिक्षणातील करिअरच्या संधी, शरीर शुध्दीक्रिया, व्याधीनिवारण करणारी आसने आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

Back to top button