वाई नगराध्यपदी राष्ट्रवादीचे अनिल सावंत | पुढारी

वाई नगराध्यपदी राष्ट्रवादीचे अनिल सावंत

वाई; पुढारी वृत्तसेवा : नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे अपात्र ठरल्यामुळे नियमानुसार वाईचे नगराध्यक्षपद राष्ट्रवादीपुरस्कृत तिर्थक्षेत्र विकास आघाडी उपनगराध्यक्ष असलेले अनिल सावंत यांच्याकडे गेले. या निवडीमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंदोस्तव साजरा केला.

रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदाचा पदभार नियमानुसार उपनगराध्यक्ष अनिल सावंत यांनी स्वीकारला. मुख्याधिकारी रजेवर असल्याने कार्यालयीन अधिक्षक नारायण गोसावी यांनी त्यांना नगराध्यक्षपदाचा पदभार सुपूर्द केला. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे कार्याध्यक्ष संजय आप्पा लोळे यांच्या हस्ते नूतन नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी सावंत म्हणाले, आ. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाईच्या विकासासाठी झटणार असून नगराध्यक्ष काय काम करू शकतो हे निश्चित समजेल असे काम करु. प्रलंबीत विकासकामे व वाईच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून मिळालेल्या संधीला योग्य न्याय देण्याचा कसोशीने प्रयत्न करु. दरम्यान, नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आल्याने पक्षाचे सर्व नगरसेवक व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले आहे.

यावेळी आघाडीचे कार्याध्यक्ष संजय लोळे, नगरसेवक प्रदिप चोरगे, चरण गाकवाड, भारत खामकर, किशोर बागुल, राजेश गुरव, संग्राम पवार, दिपक ओसवाल, अ‍ॅड. श्रीकांत चव्हाण, कांताराम जाधव, सौ. सिमा नायकवडी, सौ. शितल शिंदे, सौ. स्मिता हगीर, रेश्मा जायगुडे, प्रियंका डोंगरे, सौ. आरती कांबळे, मनिष भंडारे, अजित शिंदे, अशोकराव सरकाळे, प्रदीप जायगुडे, बापूराव खरात, युगल घाडगे, संदीप डोंगरे, विकास जाधव आदींसह अनेकजण उपस्थित होते.

Back to top button