

सातारा; पुढारी वृत्तसेवा : नागठाणे (ता. सातारा) येथे एका महिलेचा खून झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. महिलेचा खून झाल्याचे समोर येताच खळबळ माजली आहे.
सौ. मालन बबन गायकवाड (वय ५५, रा. नागठाणे) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून मारहाणीत मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी, नागठाणे येथील एसटी स्टँड परिसरात महिला भाड्याने रहात होती. मंगळवारी सकाळी या घटनेची माहिती समोर आल्यानंतर बोरगाव पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
घटनास्थळी पहिले असता महिलेला मारहाण झाली असून तिच्या अंगावर व्रण आहेत. पोलिस पंचनामा करत असून शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल.
पोलिसांनी घटनास्थळी ठसे तज्ज्ञांना पाचारण केले आहे.
पोलिसांनी उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला असून पुढील तपास सुरू आहे.
ही खुनाची ही घटना उघडकीस आल्याने नागठाणे गावात एकच खळबळ उडाली आहे.