बंदूक हातात घेऊन व्हॉट्स अॅप स्टेटस ठेवणाऱ्यांना दाखवला पोलिसी खाक्या | पुढारी

बंदूक हातात घेऊन व्हॉट्स अॅप स्टेटस ठेवणाऱ्यांना दाखवला पोलिसी खाक्या

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : हातात बंदूक अन् मुळशी पॅटर्न चित्रपटातील संवादाचा व्हिडिओ व्हॉटस् स्टेटस ठेवणे तिघा तरुणांना भोवले.

दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

मोहसीन अमीर फकीर (वय १९ रा. कबनूर), अभिजीत राजाराम तावदारे (वय २९ रा. गोकुळ चौक) व हैदर मन्सुर मुजावर (वय २१ रा. बागडे गल्ली) यांच्यावर कारवाई करण्यात आली.

अधिक वाचा :

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, कबनूर येथील मोहसीन फकीर याने आपल्या दोन मित्रांसोबत हातात बंदूक आणि मुळशी पॅटर्न चित्रपटातील संवाद असलेला व्हिडिओ मोबाईलवर शूट केला.

तो व्हिडिओ व्हॉटस्अप स्टेटसला ठेवला आणि व्हायरलही केला.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी संशयित मोहसीन अमीर फकीर (वय १९ रा. कबनूर), अभिजीत राजाराम तावदारे (वय २९ रा. गोकुळ चौक) व हैदर मन्सुर मुजावर (वय २१ रा. बागडे गल्ली) या तिघांना ताब्यात घेतले.

अधिक वाचा :

दरम्यान स्टेटस करताना वापरलेली बंदूक ही लायटर असल्याचे तपासात पुढे आले. पोलिसांनी ती जप्त केली आहे. तिघेही महाविद्यालय शिक्षणासह कामही करत आहेत.

शहर व परिसरात असे प्रकार घडत असतील तर नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपअधिक्षक बी. बी. महामुनी यांनी केले आहे.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : नंदवाळमध्ये विठ्ठल कसे प्रकटले?

Back to top button