काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना आम्ही सोडवली : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना आम्ही सोडवली : मुख्यमंत्री शिंदे

शिराळा; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या दावणीला बांधलेल्या शिवसेनेला सोडविण्याचे काम आम्ही केले. 50 आमदारांनी मला साथ दिली. बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपबरोबर केलेली युती तोडण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

शिराळा येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार विनय कोरे, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक, आनंदराव पवार यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, किंगमेकर होणेे हे बाळासाहेबांचे विचार होते; मात्र सत्तेसाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारला मूठमाती देण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले. सत्तेची हाव, मोह सुटला. त्यामुळे पक्ष संपला, माणसे गेली; मात्र मी बाळासाहेब यांचा विचार सोडला नाही. विचारांशी तडजोड केली नाही. लॉकडाऊन काळात जे गळ्याला व कमरेला पट्टा लावून बसले होते, त्यांना आता माझ्यामुळे पळायची वेळ आली आहे. नरेंद्र मोदी जनतेसाठी रोटी, कपडा व घर देत आहेत, तर काँग्रेसने कुटुंबातील मुख्य व्यक्ती मृत झाल्यास त्यातील काही संपत्ती सरकार जमा करण्याचे षड्यंत्र रचले आहे.

धैर्यशील माने म्हणाले, लोकसभेत नागपंचमीचा प्रश्न मांडणारा मी पहिला खासदार आहे. विरोधकांनी मी कोणती विकासकामे केली, हा खासदार काय करतो, हे पुस्तक पाहून टीका करावी.

Back to top button