४२ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : साहित्य ग्रामीण किंवा नागरी असे काही नसते; प्रा.रंगनाथ पाठारे | पुढारी

४२ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन : साहित्य ग्रामीण किंवा नागरी असे काही नसते; प्रा.रंगनाथ पाठारे

विटा; पुढारी वृत्तसेवा : साहित्यिकाला पडणारे प्रश्न हे सर्वसामान्यांचेच असतात. त्यातून निर्माण झालेली कलाकृती म्हणजे साहित्य. त्यामुळे साहित्य ग्रामीण किंवा नागरी असे काही नसते असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रंगनाथ पाठारे यांनी व्यक्त केले.

विट्यात ४२ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन पार पडले. यांत संमेलनाध्यक्ष म्हणून प्रा.रंगना थ पाठारे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बळवंत महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संमेल नाचे स्वागताध्यक्ष डॉ.विठ्ठल शिवणकर, कुंडलि क एडके,डॉ.प्रकाश महानवार,डॉ. मुरहरी केळे आदी उपस्थित होते. प्रा.रंगनाथ पाठारे म्हणाले ग्रामीण भागातही उत्कृष्ट साहित्य निर्मिती होत आहे. ग्रामीण महाराष्ट्र हा या साहित्याचे उगम स्थान आहे. पण म्हणून मी ग्रामीण साहित्य आणि शहरी साहित्य असा भेदभाव मानत नाही.उलट साहित्य संमेलनाची खरी लाट ही ग्रामीण भागात आहे. शब्दसृष्टीचे वैभव वाढवण्यासाठी ग्रंथालय महत्त्वाची भूमिका वटवतील. आता पंत साहित्य हे श्रेष्ठ साहित्य अशी समाजाची धारणा होती, पण परकीय सत्तेने जेव्हा आपल्या साहित्याचा अभ्यास केला. तेव्हा त्यांना तुकोबांचे अभंग श्रेष्ठ वाटले आणि त्यांनी त्यांच्या भाषेत अनुवादित केले. मात्र या सगळ्यात वाचक हा अतिशय महत्वा चा घटक आहे. अनेक प्रकारचे ज्ञान साहित्य आहे. संकोच वाड्मय , विज्ञान प्रयोग हे साहित्य आहे. साहित्य म्हणजे भावनिक ज्ञान भावनिक ज्ञानाचा संस्कार म्हणजे साहित्य. साहित्य आणि संस्कृतीचे प्रतीक म्हणजे संमेलन. पु.ल. देशपांडे हे समाजाला पुलकित करणारे महाराष्ट्राचे वैभव होते. साहित्यिक हे हस्तिदंतीय महालात राहणारे हत्ती असतात असे जरी असले तरी फक्त साहित्य नव्हे तर सुजन तत्वाचा खरा मानकरी हा शेतकरीच असतो असेही प्रा. पाठारे यांनी सांगितले.

डॉ. मुरहरी केळे म्हणाले , ग्रामीण साहित्य विविध विषयाला स्पर्श करून जाते. धर्म, अर्थ,काम व मोक्ष हे साहित्याने परिपूर्ण होतात. साहित्याला कोणतीही जात नसते. मात्र कसदार साहित्य लिहिणे हे येरा गबाळ्याचे काम नाही. परवा कोणीतरी पीएचडी मिळवून काय दिवे लावतात माहित नाही असे म्हटले होते. परंतु मी स्वतः पीएचडी धारक आहे, आणि वीज अभियंता आहे त्या अर्थाने मी अनेक ठिकाणी दिवे लावलेत अशी कोटीही डॉ. केळे यांनी केली. समाज माध्यमांमुळे नवतरुण साहित्यापासून दुरावत आहे ,पण चांगले साहित्य, मान्यवरांचे विचार पुन्हा तरुण वर्गाला योग्य मार्गावर आणतील अशी अपेक्षा कुंडलिक एडके यांनी व्यक्त केली. डॉ. प्रकाश महानवार म्हणाले ,सायन्स आणि साहित्य हे पूरक आहे. मानवाची सुरुवातच सायन्स आणि साहित्य यांच्या मेळीने होते. ग्रामीण साहित्याचे फार मोठे योगदान दिवसाच्या जडणघडणीत आहे. ७०% लोक ग्रामीण भागात राहतात त्यांचे आचार विचार म्हणजे साहित्य. साहित्य हे ग्रामीण किंवा नागरी नसते समाज जीवनाचा आरसा दाखवते,असेही डॉ. महानवार म्हणाले.

डॉ.विठ्ठल शिवणकर यांनी स्वागत केले.डॉ . ऋषिकेश मेटकरी यांनी प्रास्ताविक केले. वैशाली कोळेकर अतिथी परिचय करून दिला. डॉ. ज्योस्त्ना मेटकरी आणि रुपाली निरगुडे यांनी सूत्रसंचालन केले, तर अभिजीत निरगुडे यांनी आभार मानले. यावेळी योगेश्वर मेटकरी, हर्षवर्धन मेटकरी, राजू गारोळे, तात्यासो शेंडे, राहुल बल्लाळ, पांडुरंग होनवार, संदीप पाटोळे, अमोल वाघमारे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

Back to top button