मोबाईलवर दंडाचा मेसेज आला आणि... | पुढारी

मोबाईलवर दंडाचा मेसेज आला आणि...

विटा : पुढारी वृत्तसेवा :  मोबाईलवर दंडाचा मेसेज आला आणि बारा दिवसांपूर्वी चोरीला गेलेल्या आलिशान गाडीचा छडा लागला. अत्यंत नाट्यपूर्ण पद्धतीने तपास करत विटा पोलिसांनी संबंधित संशयित जेरबंद केले आणि गाडीही जप्त केली. रोहन बिरु सोनटक्के (वय 21, रा. मुरुम, ता. उमरगा, जि उस्मानाबाद) असे संशयिताचे नाव आहे.

गार्डी (ता. खानापूर) येथील संतोष भिकु भोईटे यांनी गाडी (एम एच11सी जी 4116) विट्यातील एका मिस्त्रीकडे दुरुस्तीसाठी दिली होती. यावेळी त्यांची कार चोरीला गेली. दुसर्‍या दिवशी भोईटे यांनी विटा पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी विटा परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी भोईटे यांना त्यांच्या मोबाईलवर त्यांच्या गाडीची दंडाची पावतीचा मेसेज आला. त्यावरून त्यांनी पुन्हा विटा पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. संबंधित कार दौंड पास करून पुढे गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पुन्हा सीसीटीव्ही फुटेज तपासले संशयित रोहन हा भोसरी (पुणे) येथे चोरी केलेल्या गाडीसह वास्तव्यास असल्याचे समजले. पोलिसांनी परिसरात सापळा रचून कारसह रोहन याला अटक केली.

Back to top button