जत : कर्नाटकात समावेशासाठीचे दंडवत आंदोलन तात्पुरते स्थगित | पुढारी

जत : कर्नाटकात समावेशासाठीचे दंडवत आंदोलन तात्पुरते स्थगित

जत; पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यातील वंचित गावासाठी वरदायी ठरणाऱ्या म्हैसाळ विस्तारित सिंचन योजनेची निविदा झालेली कामे त्वरित सुरू करावी. यासाठी पाणी संघर्ष समिती उमदीच्या वतीने शुक्रवारी (दि. २४) रोजी उमदी व मुचंडी येथे होणाऱ्या रस्ता रोको व उमदी ते चडचण कर्नाटक सीमेपर्यंत दंडवत आंदोलनास जलसंपदा अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर तात्पुरती स्थगिती दिली आहे. अशी माहिती पाणी संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

यावेळी ताकारी म्हैसाळ उपसा सिंचन व्यवस्थापन विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांनी पाणी संघर्ष समितीस विस्तारित योजनेची निविदा झालेल्या कामाची त्वरित अंमलबजावणी करत असल्याबाबतचे लेखी पत्र देण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी समिती बरोबर उमदी येथे सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

जत विस्तारित सिंचन योजनेच्या टेंडर झालेल्या कामाची त्वरित सुरुवात करावी. उर्वरित मंजूर झालेल्या कामाचे टेंडर काढण्यात यावे यासाठी तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवारी (दि २५) रस्ता रोको व उमदी ते चडचण कर्नाटक सीमेपर्यंत आम्हाला कर्नाटक राज्यात समावेश करावा म्हणून दंडवत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आले होते. मात्र जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दोन महिन्यात जत विस्तारित सिंचन योजनेच्या कामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

यावेळी प्रांताधिकारी अजितकुमार नष्टे, तहसीलदार जीवन बनसोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, पाणी संघर्ष समितीचे समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार, उपाध्यक्ष अनिल शिंदे, निवृत्ती शिंदे, गोपाल माळी, कलापा हलकुडे, शशिकांत पाटील, महमद कलाल, चिदानंद संख, महांतेश पाटील, अरविंद मुंगळे, तानाजी मोरे, श्रीमंत परगोंड, राघवेंद्र लोहार, रोहित शिंदे, कुलदीप पवार, सिद्धू मडवले, रियाज शेख, कलपा इंगलागी, कुमार कंचगार, पिंटू कोकले, महादेव मोरे, नितीन माळी आदी उपस्थित होते.

Back to top button