सांगली : सखं-दरीबडची रस्त्यावर अपघात, दोनजण जागीच ठार | पुढारी

सांगली : सखं-दरीबडची रस्त्यावर अपघात, दोनजण जागीच ठार

जत, पुढारी वृत्तसेवा : संख दरीबडची रस्त्यावर मोटरसायकल व ट्रॅक्टर यांच्या अपघातात दोन तरुण जागीच ठार झाले आहेत.  ही घटना रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. रात्री उशिरा या घटनेची पोलिसात नोंद नव्हती. अरविंद गोविंद कोरे (वय २२) सुभाष मनोहर कांबळे (वय.२४) (रा. खंडनाळ)असे अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावे आहेत.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, अरविंद कोरे व सुभाष कांबळे हे दोघेजण मित्र आहेत. दोघे संखला जात होते. दरम्यान दरीबडचीकडे जाणाऱ्या ट्रॅक्टरला मोटरसायकलने जोरात धडक दिली. यात अरविंद कोरे व सुभाष कांबळे हे दोघेजण जागीच ठार झाले आहे. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री ग्रामीण रुग्णालयात शवाविच्छेदन सुरू होते.

हेही वाचलंत का?

Back to top button