आटपाडी : तहसीलदार – कोतवाल विरोधात कायदेशीर कारवाईसाठी रिपब्लिकन पार्टीचा रास्ता रोको | पुढारी

आटपाडी : तहसीलदार - कोतवाल विरोधात कायदेशीर कारवाईसाठी रिपब्लिकन पार्टीचा रास्ता रोको

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा : आटपाडीच्या तहसीलदार बाई माने आणि कोतवाल संजय माने यांनी वाळू माफियाशी असलेल्या घनिष्ठ संबंधातून अमाप संपत्ती जमवून शासनाच्या महसूलावर डल्ला मारला आहे. यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना लवकरात – लवकर बडतर्फ करावे, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टीने रास्ता रोको आंदोलन केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांच्या नेतृत्वाखाली रणजित ऐवळे, भारत वाघमारे, धनंजय वाघमारे, नवनीत लोंढे, विशाल काटे व कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि.२७) रोजी दुपारी १२ ते १ दरम्यान तहसील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन छेडले. यावेळी आटपाडी दिघंची येथील रस्त्यावर ठाण मांडून तासभर रास्ता रोको करण्यात आले.

या आदोलनावेळी राजेंद्र खरात म्हणाले की, कोतवाल संजय माने हे आपल्या पदाचा गैरवापर करीत आहेत. अवैध धंदे व वाळु माफियाशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. बेकायदेशीरपणे हप्ते गोळा करून अमाप संपत्ती कमविली आहे. प्रती तहसिलदार म्हणून ते काम पाहत असतात. वरिष्ठ अधिकारी त्यांना अभय देत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे दोषी अधिकारी आणि कोतवालाची चौकशी करून लवकरात-लवकर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांकडून केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button