सांगली : जिल्ह्यात कोरोनाचे ९८४ नवे रुग्ण : १९ बळी | पुढारी

सांगली : जिल्ह्यात कोरोनाचे ९८४ नवे रुग्ण : १९ बळी

सांगली : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे नवे 984 रुग्ण सापडले आहेत. 1 हजार 120 जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात कोरोनाने 19 जणांचा मृत्यू झाला. तर 986 जण गंभीर असल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. म्युकर मायकोसिसने जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला असून नवे 3 रुग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या 1 लाख 54 हजार 782 झाली आहे. सध्या 9 हजार 713 व्यक्ती उपचाराखाली आहेत. आज दिवसभरात आरटीपीसीआरच्या 4 हजार 74 तपासण्या करण्यात आल्या. यातील 277 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहे. तर 9 हजार 472 जणांच्या अ‍ॅन्टीजन चाचणी करण्यात आली. यामध्ये 724 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. आज दिवसभरात कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्ती तालुकानिहाय : आटपाडी : 38, कडेगाव : 49, खानापूर : 78, पलूस : 57, तासगाव : 65, जत : 61, कवठेमहांकाळ : 56, मिरज : 112, शिराळा : 48, वाळवा :200, सांगली शहर : 186, मिरज : 34.

सांगलीसह इतर जिल्ह्यातील 19 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कडेगाव तालुक्यातील 3 खानापूर 2, पलूस 1, कवठेमहांकाळ 2, मिरज 1, शिराळा 1, वाळवा 2, सांगली शहर 1 आणि मिरज शहर 1 अशा एकूण 17 जणांचा मृत्यू झाला. आहे. परजिल्ह्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील 1 आणि सातारा जिल्ह्यातील 1 अशा दोघांचा मृत्यू झाला. आजअखेर जिल्ह्यातील 4 हजार 231 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 5 , सोलापूर 5, सातारा 2, पुणे 1, नागपूर 1 आणि कर्नाटकमधील 3 अशा 17 पॉझिटिव्ह जणांवर उपचार सुरू आहेत. होम आयसोलेशनमध्ये 8 हजार 34 जण आहेत.

आजअखेर तालुकानिहाय कोरोना पॉझिटिव्ह

आटपाडी: 9185 जत : 11981 कडेगाव :10981
कवठेमहांकाळ : 8128 खानापूर : 12006 मिरज : 16716

पलूस : 8577
शिराळा : 9159 तासगाव : 11754
वाळवा : 22516 महापालिका क्षेत्र : 33,779

Back to top button