सांगली : माळेवाडी येथे अपघात महिला ठार; एक जखमी | पुढारी

सांगली : माळेवाडी येथे अपघात महिला ठार; एक जखमी

कोकरूड; पुढारी वृत्तसेवा :  कोकरूड-शिराळा मार्गावर माळेवाडी (ता. शिराळा) नजीक मोटारसायकल अपघातात रेखा गणपती सुतार (वय 49, करुंगली ता.शिराळा) यांचा जागीच मृत्यू झाला. पती गणपती शंकर सुतार (वय 56) हे जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी घडला. या अपघाताची नोंद कोकरूड पोलिस ठाण्यात झाली आहे. सुनील सहदेव सुतार (वय 46) यांनी पोलिसात वर्दी दिली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शनिवारी पती गणपती आणि पत्नी रेखा हे मोटारसायकल (एम.एच. 10-डीसी-8744) वरून सासरवाडी भेडसगाव येथे जात होते. कोकरूडपासून काही अंतरावर माळेवाडी येथे आले असता अचानक समोरून दोन-तीन कुत्री मोटारसायकलच्या आडवी आली. त्यातील एक कुत्रे मध्यभागी मोटार सायकलच्या पुढील चाकाच्यामध्ये अडकले. यावेळी पाठीमागे बसलेल्या रेखा सुतार या रस्त्यावर जोराच्या आपटल्या. त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागला. तर त्यांचे पती हे किरकोळ जखमी झाले. रेखा यांना तातडीने कोकरूड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

Back to top button