सांगली : ‘त्या’ कैद्याचा गुंगारा; शोधमोहीम थंडावली! | पुढारी

सांगली : ‘त्या’ कैद्याचा गुंगारा; शोधमोहीम थंडावली!

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  येथील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात भिंतीवरून उडी मारून पलायन केलेल्या सुनील राठोड हा कैदी सव्वा महिना होऊन गेला तरी अजूनही पोलिसांना गुंगारा देत फरारीच आहे. त्याचा कुठेच सुगावा लागत नसल्याने पोलिसांची शोधमोहीम थंडावली असल्याचे चित्र आहे.

तासगाव येथील जेसीबी चालकाचा खून केल्याप्रकरणी सुनील राठोड याला अटक केली होती. तो मूळचा कर्नाटकातील आहे. वर्षभरापासून जिल्हा कारागृहात बंदी होता. स्वच्छता करण्यासाठी त्याला बरॅकमधून बाहेर काढण्यात आले होते. तेथील पोलिसांची नजर चुकवून त्याने कारागृहाच्या भिंतीवरून उडी मारून पलायन केले होते. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
राठोड हा रस्त्यावर कोणाकडून तरी मोबाईल घेऊन पत्नीला फोन करीत असे. पोलिसांना त्याचा ठावठिकाणाही लागला होता. मात्र पोलिस जाण्यापूर्वी तो तेथून पसार झालेला असायचा. कारागृहातील दोन सुरक्षा रक्षकांची चौकशी करून त्यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला होता.

Back to top button