म्यू व्हेरियंट या कोरोनाच्या नव्या विषाणूचा धाेका

म्यू व्हेरियंट या कोरोनाच्या नव्या विषाणूचा धाेका
Published on
Updated on

जीनिव्हा; पीटीआय : 'म्यू' नावाच्या नवीन कोरोना विषाणूचा बारकाईने अभ्यास करत आहोत, असे सांगून कोरोनाच्या नव्या म्यू व्हेरियंट च्या आगमनाचे वृत्त देत जागतिक आरोग्य संघटनेने गुरुवारी (डब्ल्यूएचओ) जागतिक समुदायाची चिंता वाढविली.

कोरोनाचा हा नवीन प्रकार कोव्हिड-19 प्रतिबंधक लसीला जुमानत नाही. कोरोनाचा नवीन प्रकार अनेक देशांमध्ये आढळला असून, तो अतिशय संक्रमक असल्याचे सांगितले जात आहे.

'म्यू' नावाच्या या प्रकाराचे शास्त्रीय नाव बी.1.621 असे आहे. संयुक्‍त राष्ट्र आरोग्य संस्थेने मंगळवारी महामारीवरील आपल्या साप्‍ताहिक बुलेटिनमध्ये सांगितले की, पहिल्यांदा जानेवारी 2021 मध्ये कोलंबियात हा प्रकार समोर आला होता. तेव्हापासून या विषाणूची लागण होण्याच्या छोट्या-छोट्या बातम्या येत आहेत.

दक्षिण अमेरिका आणि युरोपमध्ये या नवीन विषाणूने मोठ्या प्रमाणात लोक बाधित झाल्याचेही सांगितले जात आहे. ब्रिटन, युरोप, अमेरिका आणि हाँगकाँगमध्ये 'म्यू' व्हेरियंटची प्रकरणे समोर आली आहेत.

सद्यस्थितीत 'म्यू' व्हेरियंट चा जागतिक प्रसार 0.1 टक्क्याहून कमी आहे. मात्र, काही देशांमध्ये वेगाने फैलावत असलेल्या संक्रमणामुळे जगात दहशत निर्माण करत आहे. जगातील 39 देशांमध्ये हा प्रकार आढळल्यानंतर तो 'डब्ल्यूएचओ'च्या अभ्यासाच्या यादीत आला.

मुंबईत म्युकरचा धोका वाढला

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : एकीकडे कोरोनाची दुसरी लाट काहीशी कमी होत असतानाच तिसर्‍या लाटेची शक्यता व्यक्त केली आहे. त्यातच शहरात म्युकरमायकोसिसचे गेल्या दीड महिन्यात 298 रुग्ण सापडले असून 74 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

म्युकरच्या रुग्णांची संख्या 918 वर गेली असून त्यातील 178 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 551 रुग्ण बरे झाले असून 189 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 13 जुलैला म्युकरचे एकूण रुग्ण 620 तर 104 रुग्ण दगावले होते. त्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत रुग्णांचा आकडा 918 वर पोचला तर 178 रुग्णांचा मृत्यू झाला.

सध्याची एकूण आकडेवारी पाहिली तर केवळ दीड महिन्यात 298 रुग्णांची भर पडली तर 74 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रुग्णवाढीचा टक्का 32 ने तर मृत्यूचा आकडा 40 टक्क्यांनी वाढला असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news