

पुढारी ऑनलाईन डेस्क : भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा सोशल मीडियावर चर्चेत असते. मोनालिसा फक्त भोजपुरी सिनेमातच प्रसिध्द नाही तर हिंदी सिनेमातही प्रसिध्द आहे. तिने अनेक हिंदी सिरियल्स मध्ये काम केलं आहे. तिने तिच्या अदांनी चाहत्यांची मन जिंकली आहेत. ती सोशल मीडियावर नेहमी फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. ती मालदीवमध्ये पतीसोबत सुट्टीला गेली आहे. तिने मालदीवमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मोनालिसाने जे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत तिचा पती विक्रांत सिंह राजपुत दिसत आहे. तिने सहा फोटो शेअर केले आहेत. या फोटोत मोनालिसा समुद्रात पतीसोबत ब्रेकफास्ट करत असल्याची दिसत आहे. दोघेही रोमँटीक मुडमध्ये दिसत आहेत. मोनालिसाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोला आतापर्यंत १ लाख २७ हजार लाईक्स आल्या आहेत.
तिच खरं नाव अंतरा बिस्वास आहे. मोनालिसा बिग बॉस सीझन १० ची स्पर्धक होती. यानंतर ती प्रसिध्द झाली. बिग बॉसच्या घरात मोनालिसाचे तिचा बॉयपफेंड विक्रांत सिंह सोबत लग्नही झालं होत. मोनालिसा सध्या 'नमक इश्क' या सिरियल मध्ये काम करत आहे.