Gold Price Today : सोने स्वस्त, चांदी महागली, जाणून घ्या नवे दर | पुढारी

Gold Price Today : सोने स्वस्त, चांदी महागली, जाणून घ्या नवे दर

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : सराफा बाजारात आज गुरुवारी (दि. २ सप्टेंबर) सोन्याच्या दरात काही प्रमाणात घसरण दिसून आली. २४ कॅरेट सोन्याचा (Gold Price Today) प्रति १० ग्रॅम भाव ५५ रुपयांनी कमी होऊन ४७,२२४ रुपयांवर पोहोचला. सोन्याच्या दरात घसरण होत असली तरी गुरुवारी चांदी प्रति किलोमागे ६१९ रुपयांनी महागली.

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, (दुपारी १२ वाजेपर्यंतचे अपडेट्स) गुरुवारी २ सप्टेंबर रोजी २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) ४७,२२४ रुपये, २३ कॅरेट सोने ४७,०३५ रुपये, २२ कॅरेट सोने ४३,२५७ रुपये, १८ कॅरेट ३५,४१८ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर २७,६२६ रुपये होता. तर चांदीचा प्रति किलो भाव ६३,६९१ रुपये होता. (Gold Price Today)

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते.

दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला तेजी येणार?

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात यावर्षी सोने प्रति औंस १,९५० ते २ हजार डॉलरवर जाण्याची शक्यता सराफा बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)

अमेरिकेतील आर्थिक स्थिती आणि महागाईच्या शक्यतेने सोन्याच्या दरात तेजी येऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सराफ
gold file photo

सणासुदीच्या काळात सोन्याला मागणी वाढून दर वाढू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : एक एकर टोमॅटो शेतीसाठी खर्च किती आणि हातात मिळतात किती ?

Back to top button