सांगली : कुपवाड येथे घरफोडी; दागिन्यांची चोरी | पुढारी

सांगली : कुपवाड येथे घरफोडी; दागिन्यांची चोरी

कुपवाड; पुढारी वृत्तसेवा : शहरातील उज्ज्वला प्रेमसिंग चव्हाण (रा. जुना बुधगाव रोड, यल्लमा मंदिर मागे, कुपवाड) यांच्या घराच्या टेरेसवरील उघड्या दरवाजातून चोरट्यांनी घरात प्रवेश करून सोने, चांदीचे दागिने, दोन मोबाईल असे एकूण 17 हजार 900 रुपयांची चोरी केली आहे. याबाबत कुपवाड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : उज्ज्वला चव्हाण यांच्या टेरेसवरील उघड्या दरवाजातून चोरट्यांनी बुधवारी रात्री (दि. 31) घरात प्रवेश केला. स्वयंपाकघरातील डब्यात ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र, जिन्याजवळ ठेवलेले दोन मोबाईल व लोखंडी तिजोरीत ठेवलेली सोन्याची नथ, ब्रेसलेट, करंडा अशा 17 हजार 900 रुपयांच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली आहे. दरम्यान, यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button