सांगली : होड्यांच्या स्पर्धेवेळी बोट उलटली (व्हिडीओ) | पुढारी

सांगली : होड्यांच्या स्पर्धेवेळी बोट उलटली (व्हिडीओ)

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  सांगलीवाडी येथील फ्रेंड्स यूथ फाऊंडेशन आणि रणसंग्राम मंडळ यांच्या वतीने कृष्णा नदीत होड्यांच्या स्पर्धा भरविल्या होत्या. स्पर्धा सुरू असताना काही वेळानंतर अचानक एक होडी उलटली. होडीमधील सहाजण नदीमध्ये पडले. परंतु ते सर्वजण पोहत काठावर आल्याने बचावले. ही घटना रविवारी सायंकाळीघडली.

कोरोनामुळे दोन वर्षे होड्यांच्या स्पर्धा झाल्या नव्हत्या. कृष्णा नदीची पाणीपातळी स्थिर असल्याने होड्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सांगलीवाडी, कवठेपिरान, कसबे डिग्रज, कवठेसार, शिरोळ या ठिकाणवरील 9 बोटी या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. स्वामी समर्थ घाटावरून स्पर्धेला सुरुवात झाली. सांगलीवाडीच्या रॉयल कृष्णा बोट क्लबच्या होडीने प्रथम क्रमांक पटकावला. मात्र, पाण्याच्या प्रवाहात एक बोट उलटून बुडाली. बोटमध्ये असणारे सहा जणांना पोहता येत असल्याने ते सर्वजण नदी काठावर सुखरूप पोहोचले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र या घडलेल्या घटनेमुळे आयोजकांचे चांगलेच धाबे दणाणले होते. स्पर्धा पाहण्यासाठी सांगलीकरांनी गर्दी केली होती.

Back to top button