सांगली : साथीच्या आजारांत वाढ | पुढारी

सांगली : साथीच्या आजारांत वाढ

कडेगाव; पुढारी वृत्तसेवा : कडेगाव शहरासह तालुक्यात मागील काही दिवसांपासून विविध साथीच्या रोगांचा फैलाव झाला आहे. त्यामुळे लोक हैराण झाले आहेत. याकडे आरोग्य खात्याचे दुर्लक्ष आहे. नगरपंचायत प्रशासनासह तालुक्यातील ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

रुग्णालये हाऊसफुल्ल

शहरासह अनेक गावांत डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्याने लोकांत भीतीचे वातावरण आहे. रुग्णांना थंडी, ताप, खोकला, सर्दी, अंगावर विविध प्रकारचे पुरळ उठणे, अंग खाजवणे, जुलाब असे प्रकार सुरू झाले आहेत. त्यामुळे सरकारी दवाखान्यांसह खासगी रुग्णालयात उपचारासाठी रांगाच्या रांगा लागल्या आहेत.

दूषित पाण्याचा मोठा परिणाम

येथील तलावातील पाणी गडूळ झाले आहे. नळ पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीचे पाणीही दूषित होत आहे. जास्त दिवस साचलेले पाणी व वातावरणातील बदलामुळे साथींच्या आजाराचे प्रमाणात वाढ झाली आहे. नगर पंचायतकडून स्वतंत्र आरोग्य विभाग सुरू करावा तसेच तालुक्यातील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांसह अनेक पदे रिक्‍त आहेत. ती पदे भरावीत, अशी मागणी आहे.

Back to top button