राज्यस्तरीय दंडोबा क्रॉसकंट्रीत मोरे प्रथम | पुढारी

राज्यस्तरीय दंडोबा क्रॉसकंट्रीत मोरे प्रथम

कवठेमहांकाळ : पुढारी वृत्तसेवा 16 वर्षांनंतर घेण्यात आलेल्या आप्पाजी फाऊंडेशन व श्री महांकाली स्पोर्टस् ग्रुपच्या वतीने घेण्यात आलेल्या दंडोबा राज्यस्तरीय क्रॉसकंट्री स्पर्धेत खुल्या पुरुष गटांमध्ये विवेक मोरे तर खुल्या महिलांमध्ये रोहिणी पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच 45 वर्षांवरील पुरुष गटात शिवलिंगाप्पा गोटाजी तर महिला गटात डॉ. माधुरी गुजर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजा स्वामी, वसंतराव जाधव, लोकनेते नानासाहेब सगरे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दंडोबा स्पर्धेचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय खेळाडू जगन्नाथ लकडे, अप्पर पोलिस अधीक्षक मनीषा डुबुले, महांकाली कारखान्याच्या अध्यक्ष अनिता सगरे यांच्या हस्ते झाले.

निकाल असा : खुला गट (पुरुष) : प्रथम – विवेक मोरे, द्वितीय – धुळदेव घागरे, तृतीय -प्रथमेश कोळंबकर. खुला गट (महिला): प्रथम -रोहिणी पाटील,द्वितीय- वैष्णवी मोरे, तृतीय- हर्षदा डवरे. 18 वर्षांखालील (मुले) : प्रथम- सुमंत राजबल, द्वितीय – अमितराया नाईक, तृतीय- ओंकार नलवडे. 18 वर्षांखालील (मुली): प्रथम -तृप्ती किरवे, द्वितीय – शिवानी गोंडघर तृतीय- वैभवी कुंभार.15 वर्षांखालील (मुले) : प्रथम – अनिल जाधव, द्वितीय- विशाल वाघमोडे, तृतीय -सौरभ जानकर. 15 वर्षांखालील (मुली): प्रथम -भक्ती मगदूम, द्वितीय- प्रणाली मंडले, तृतीय-आकांक्षा

देवकर. 12 वर्षांखाली (मुले): प्रथम – तुषार माने, द्वितीय -शुभम पुजारी, तृतीय- प्रताप सरगर.12 वर्षांखालील (मुली) : प्रथम -गौरी शिंगाडे, द्वितीय- अस्मिता कोथळी, तृतीय- श्रावणी गोसावी, 45 वर्षांखालील (पुरुष) गटात प्रथम -शिवलिंगाप्पा गोटाजी, द्वितीय- भरत मंडले, तृतीय- नितीन वाघमारे आणि 45 वर्षांखालील (महिला) प्रथम – डॉ. माधुरी गुजर, द्वितीय – डॉ.अंजली घुमार, तृतीय – उज्ज्वला कुंभार यांनी क्रमांक पटकाविले. स्पर्धेला यल्लामा देवी मंदिरापासून प्रारंभ झाला. बक्षीस समारंभ डॉ. बाबासाहेब देशमुख, शिवछत्रपती पुरस्कार विजेते युवराज खटके, संजय कलगुटकी संतोष पाटील, समीर संधी, राहुल कांबळे, राहुल गरगटे, हरिदास पाटील, शहाजी ठवरे, महादेव नरळेसह मान्यवरांच्या हस्ते झाला. आयोजन शामराव गावडे, प्रा. शौकत मुलाणी, राहुल कोठावळे यांनी केले.

Back to top button